नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत जवळ आणून चार चाकी गाडी उभी का केली याची इशाराने विचारणा केली असता पुणे येथे जाण्यासाठी ट्रॅव्हल्स पॉईंटजवळ थांबलेल्या एका युवकाला चार जणांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. मारहाण करून हल्लेखोर फरार झाले. हल्लेखोरांची चार चाकी गाडी पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.
शंकर दिलीपराव धर्माधिकारी हे मुळ रा.बरबडा ता.नायगाव येथील आहेत. ते सध्या शिवणी ता.हवेली जि.पुणे येथे कार्यरत आहेत. 20 जानेवारीच्या रात्री 9.30 वाजता ते हिंगोली गेटजवळील के.एफ.इंटरप्रायजेस या दुकानासमोरील मैदानात उभे असतांना त्यांच्यासोबत सोडण्यासाठी आलेले त्यांचे बंधू आणि एक मित्र बालाजी गिरे हे पण होते. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या महागड्या चार चाकी गाडीत आलेल्या युवकांनी ती चार चाकी गाडी त्यांच्या दुचाकीला लागेल अशी रोखून अत्यंत जवळ उभी केली. त्यावेळी शंकर धर्माधिकारी यांनी त्यांना इशाराने हे काय आहे अशी विचारणा केली असता त्या गाडीतील दोघे खाली उतरले. त्या चार चाकीच्या पाठीमागे एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी अशा चौघांनी मिळून शंकर धर्माधिकारींना मारहाण केली.शंकर धर्माधिकारी यांच्या छातीवर मारले तसेच लागडांनी आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यांच्या दुचाकीची मोडतोडपण केली. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी 25/2025 हा गुन्हा दाखल केला आहे. त्यात मोनु आणि मनप्रित तसेच इतर दोन अनोळखी व्यक्ती अशी नावे आरोपी सदरात नमुद आहेत. पोलीसांनी हल्लेखोरांची काळ्या रंगाची चार चाकी गाडी ताब्यात घेतली आहे.