सचखंड गुरूद्वाऱ्याचे संपूर्ण जगभरात खुप वेगळेच महत्त्व आहे याचे दोन तीन मुख्य कारणे आहेत. जसे की इ स 1708 मध्ये श्री गुरु गोबिंद सिंघ जी महाराजांनी या पवित्र स्थळी देहधारी गुरु परंपरेला विश्राम देत श्री आद गुरु ग्रंथ साहीब ला गुरु ची पदवी बहाल करत संपूर्ण शिख समाजाला “आग्या भयी अकाल की तभी चलायो पंथ | सब सिक्खन को हुकम है गुरु मानीयो ग्रंथ गुरु ग्रंथ जी मानीयो प्रगट गुराह की देह” अर्थात सर्व शिख समाजाला आदेश आहे. अकाल ( जगाची पालन पोषण करनारा परमेश्वर) आदेशानुसार पंथ चालवीले आहे व सर्व शिख समाजाला आदेश आहे की या पुढे गुरु ग्रंथ साहीब ला गुरु मानावे याच्या मध्येच गुरु देह रूपाने प्रगट आहे.तसेच गुरुजींनी आपल्या सतयुगात तप केलेल्या स्थानाला प्रगट केले होते हे स्थान म्हणजे आजच्या संचखड गुरूद्वारा. याच्या नंतर गुरूजींनी या स्थळावरूनच सांसारिक यात्रा पूर्ण करत येथुन आलोप झाले……… तसेच या ठीकाणच्या गुरूद्वाऱ्या मधील पाठ पुजे ची मर्यादा ही जगभरातील अन्य ऐतिहासिक गुरूद्वाऱ्या पेक्षा वेगळी असल्याने ही या गुरूद्वाऱ्याला विशिष्ट महत्त्व व गुरु महाराजाच्या कथना नुसार ” सद हजूरि हाजर है नाजरू, कतहि न भइओ दूराई ||2||” म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष गुरु महाराज नेहमी उपस्थित राहणार आहेत कधी दुर जाणार नाही. म्हणून संचखड गुरूद्वारा हा जागृत देवस्थान आहे म्हणून प्रचलित आहे तसेच या ठिकाणी गुरु दरबारी जो कोणी सांसारिक जीवनातील गोष्टी बाबतीत मागणी अरदास ( प्रार्थना) करतो त्याला कधी निराशा पदरी पडत नाही. ……………..आता आपण या ठिकाणांच्या मुख्य पुजारी म्हणजेच शिख समाजात जत्थेदार साहिब म्हणून संबोधले जाते यांच्या सेवा करण्याच्या कार्य पध्दती वर नजर टाकल्यास येथील जत्थेदार साहीबाचे पाठ पुजेची कार्य शैली संपूर्ण शिख जगातील अतुलनीय, अती कडक व एक ही सुट्टी न घेता अविरतपणे करावी लागते. तसे पाहिले तर शिख धर्मा नुसार ब्रम्हचारी अथवा अविवाहित राहणाऱ्या ला स्थान नाही . कारण श्री गुरु नानक देव जी महाराजांनी गृहस्थ जीवनात राहुनच सांसारिक जीवन जगण्यासाठी शिक्षा दीलेली आहे. परंतु संचखड गुरूद्वाऱ्यात श्री गुरू गोबिंद सिंघ जी महाराज यांच्या गुरतागद्दी दील्या नंतर येथील जत्थेदार ब्रम्हचारी ठेवण्याची प्रथा चालू आहे. विशेष बाब म्हणजे हे जत्थेदार साहिब आपले संपूर्ण आयुष्य फक्त व फक्त गुरु घराच्या व समाजाच्या सेवेसाठी अर्पण करून टाकतात…………….इ स 1708 ते इ स 2000 पर्यंत एकुण तीस जत्थेदार साहीबानी आपली सेवा निभावली आहे. 12-1-2000 पासून आज पर्यंत संत बाबा कुलवंत सिंघ जी हे ही सेवा चांगल्याप्रकारे निभावून नेत आहेत………..आता आपण पाहू या या सेवेचे वैशिष्ट्ये काय आहेत…………*जत्थेदार साहिब रोज सकाळी पहाटे दोन वाजता उठून आपले नित्यकर्म केल्या नंतर तीन वाजता गुरूद्वारा साहीब मध्ये आल्यावर प्रथम पाया पडल्या नंतर आतल्या परिक्रमेत गाभाऱ्याची परिक्रमा करून प्रथम अरदास केल्या नंतर गाभाऱ्यात प्रवेश करतात. तसेच घागरीया सिंघ जी नी गोदावरी पात्रातून व गुरूद्वारा परिसर मधील विहीरीतुन चांदी च्या घागरी मध्ये पाणी आणलेल्या दोन घाघरी आत गाभाऱ्यात ठेवून. गाभाऱ्यातील आद गुरु ग्रंथ साहीब व श्री दशम ग्रंथ साहिब च्या पोथ्या एक एक करून ग्रंथी सिंघ जी च्यां डोक्यावर देतात त्या पोथ्यानां ग्रंथी सिंघ वेगवेगळ्या सोन्याच्या पालखीत विराजमान केल्या नंतर सुखई सिंघ जी सुख निधान ची देग ( सरदाई ) आणल्या नंतर ते पात्र भोग लावण्यासाठी आत मध्ये ठेवून पडदा टाकुन अरदास करायला सुरुवात करतात या अरदास मध्ये आलेल्या भाविकांना आपल्या मनोकामना पूर्ण होवोत या भावनेने देणग्या पावत्या काढलेल्या असतात त्या सर्वांच्या मनोरथ पूर्ण होण्यासाठी बाबाजी अरदास करतात. या सकाळच्या अरदास बाबतीत आज पर्यंत ज्या लोकांनी भक्तिभावाने विश्र्वास ठेवून अरदास करवून घेतली आहे अशा अनेकांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. या नंतर श्री गुरु ग्रंथ साहीबजी चा ग्रंथी सिंघ जी नीं हुकुमनामा घेतल्यानंतर ( हुकुमनामा म्हणजे श्री गुरू ग्रंथ साहीब जी उघडल्या नंतर प्रथम दर्शी जो शब्द आहे तो वाचणे ) म्हणजे सर्वांसाठी आजच्या दिवसासाठी आज कसे वागावे हे गुरु महाराजांचे आदेश होय. यानंतर बाबाजी गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर आतुन गाभाऱ्याचा मुख्य दरवाजा बंद करून घेतात. विशेष बाब म्हणजे गाभारा चोही बाजुने बंद आहे व त्या अनुषंगाने हवा खेळती राहण्यासाठी काही ही उपाययोजना नाही. अशा गाभाऱ्यात बाबाजीचीं सेवा सुरू होते गोदावरी नदीच्या व विहीरीच्या पाण्याने सिंहासन ( श्री गुरु गोबिंद सिंघ जी चे तपयुगी स्थान व अंतिम स्थान) ची धुवून सफाई केल्यानंतर आत मधील सर्व सिंहासन वरील व बाकी बिछाई करून आत मधील शेकडो शस्त्रानां सिंहासनावर व आजुबाजुला साफसफाई करून चांगल्याप्रकारे सजवून ठेवतात आणि हे सर्व करीत असताना फक्त एकट्यानां हे सर्व काही करावे लागते या मुळे हे सर्व करताना व खेळती हवा नसल्याने खुप परीश्रम होते. याच्या व्यतिरिक्त आत मधील लाईट चे काम असो अथवा अन्य कुठलाही प्रकारचे कार्य सर्व बाबाजीनांच करावे लागते कारण या गाभाऱ्यात फक्त व फक्त बाल ब्रह्मचारी जत्थेदार साहेबानांच प्रेवेश करता येते. हे सर्व करत असताना बाबाजी नामस्मरणात मग्न असतात. सकाळी तीन च्या नंतर रागी सिंघा तर्फे किर्तन करने सुरू असते. मग सकाळी साडे पाच च्या दरम्यान बाबाजी थोड्या वेळे करीता आपल्या निवासस्थानी जाऊन नित्यकर्म उरकून परत आत गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सकाळच्या किर्तन समाप्ती नंतर सहा वाजता मीत जत्थेदार ( छोटे पुजारी साहेब) अरदास केल्या नंतर बाबाजी गाभाऱ्याचा मुख्य दरवाजा उघडतात व नंतर परत सुख निधान व कडाह प्रशाद चा भोग लावल्या नंतर आत मध्ये प्रवेश केल्यावर धुपीया सिंघ जी आत मध्ये एका पात्रात धुप जाळून ती बाबाजी ला देतात त्या धुप ला आत मध्ये फीरवून ती परत केल्या नंतर बाबाजी बाकीचे तीन्ही दरवाजे भावीकांच्या दर्शनासाठी खुले केल्या नंतर आतील श्री गुरू ग्रंथ साहीब व श्री दशम ग्रंथ साहीब ( श्री गुरु गोबिंद सिंघ जी यांचे लिहिलेले ग्रंथ) ग्रंथी सिंघाच्या डोक्यावर एक एक करून दुसऱ्या दरवाज्यातून देतात व ग्रंथी सिंघ जी परिक्रमा करत ते ग्रंथ बाहेर दुसऱ्या जागी स्थानापन्न करतात. अशा वेळी बाबाजी गाभाऱ्यात परिक्रमा करत करत पाठ व आतील गाभाऱ्यातील शस्त्र तथा सिंहासन वर सतत चवर करत असतात. फक्त अरदास व हुकुमनामा ( मुखवाख) घेते वेळी सोडले तर बाकी वेळेस अखंडीत पणे रागी किर्तन गायन करत असतात. सकाळी आठ च्या दरम्यान गाभाऱ्यातील मुख्य दरवाजा सोडून बाकीचे तीन्ही दरवाजे बंद केल्यानंतर अशा रीतीने सकाळ ची अखेर ची अरदास व हुकुमनामा घेणे झाल्यावर बाबाजी आठ वाजता आपल्या निवासस्थानी परत जातात. पुजेत असताना जत्थेदार साहिबचा पोषाख वेगळ्या पद्धतीचा असतो अर्थात नियमित पोषाखावरती एक सुंदर रंगीत कापड वेगळ्या पद्धतीने लपटले असते याला “गलती” म्हणून संबोधले जाते. ……… बाबाजी आपल्या निवासस्थानी ( गुरूद्वारा परिसरातच) परतल्यानंतर चहा पाणी नाष्टा केल्यानंतर थोडा वेळ आराम करून परत साडेदहा वाजता गुरूद्वाऱ्यात येऊन आरती ची थाळी घेऊन आत मध्ये आरती केल्या नंतर ती बाहेर आरती करण्यासाठी आरतिया सिंघ जी ला देतात व या वेळी रागी सिंघ आरतीचे गायन करतात.आरती संपल्यानंतर अरदास च्या नंतर गुरु महाराजांना सात पक्वान्न चा सात थाळी भरून भोग लावल्या नंतर अखंड पाठ आरंभ करण्याची अरदास केल्या नंतर, अखंड पाठ आरंभ झाल्यावर दुपारी बारा वाजता आपल्या निवासस्थानी जाऊन मग तेथून आपल्या परिवारा सोबत दोन वाजे पर्यंत वेळ घालवितात व जेवन करतात. ह्या वेळेत कोणी लग्नाचे आमंत्रण दिले किंवा कोणाच्या ही उद्घाटन समारंभ असो अथवा अन्य कुठलाही कार्यक्रमाला ही हजेरी लावतात……. तसेच या रोजच्या रुटीन कार्यक्रमा व्यतिरिक्त एक दोन दिवसात धार्मिक दिक्षा म्हणजेच अमृत संचार करण्यासाठी, अमृत तयार करण्यापासून अमृत पान करणाऱ्या व्यक्तीला धार्मिक शिक्षा देण्याची संपूर्ण जबाबदारी पंजप्यारें साहीबानाची असते त्या मध्ये बाबाजीना उपस्थित राहणे आवश्यक असते या दिवशी गुरुद्वाऱ्यातुन निघायला साडे बारा ते एक वाजून जाते. अमृत तयार करण्यासाठी कमीत कमी एक ते सव्वा तास वेळ लागतो.हे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी दोन च्या नंतर बाबाजी आपल्या निवासस्थानी गुरूद्वारा परिसरातच आराम करून पुन्हा संध्याकाळी चार वाजता सुख निधान ची गुरु महाराज ला भोग लावण्यासाठी गुरूद्वाऱ्यात येऊन भोग लावल्या नंतर परत निवासस्थानी जाऊन कोणी भेटायला आले तर थोडा वेळ भेटण्यासाठी देतात नंतर थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी सहा वाजता परत पुजा अर्चने साठी गुरुद्वाऱ्यात हाजरी भरत नियमित संध्याकाळ ची अरदास प्रसादाचा भोग लावने, परत गाभाऱ्याचे दरवाजे उघडणे,आत पाठ करत करत चवर करणे मग रहरास साहीब च्या पाठा नंतर गाभाऱ्याचे तीन्ही दरवाजे बंद करने आरती झाल्यावर आतील ऐतिहासिक निवडक शस्त्रे भावीकाना दर्शनासाठी बाहेर काढून आरतीया सिंघ ला देणे व परत आत ठेवणे तसेच सकाळी ज्या ग्रंथ साहीबाच्यां पोथ्या काढल्या होत्या ते परत आत ठेवणे ही कार्य दररोज करावी लागते. यानंतर परत काही वेळा करीता आपल्या निवासस्थानी जाऊन आलेल्या भाविकांना भेटुन त्यांच्या समस्या ऐकून त्यावर श्री गुरु ग्रंथ साहीब जी च्यां संदेशानुसार उपाय सुचविण्याचे कार्य करतात. लोकांच्या गाठीभेटी उरकून आपले जेवण करून झाल्यावर रात्री नऊ वाजता परत गुरूद्वाऱ्यात जाऊन संध्याकाळचा किर्तन सोहीले चा पाठ केल्या नंतर गाभाऱ्याचा मुख्य दरवाजा बंद करून परत आपल्या निवासस्थानी जाऊन तेथुन वॉकीग करिता गुरुद्वारा खालच्या भागाच्या परिक्रमा करत करत रात्री दहा वाजता आपल्या निवासस्थानी जाऊन आपल्या काही शिष्यांना धार्मिक बाबींच्या गोष्टी सांगणे व नंतर झोपायला आपल्या कक्षेत जातात आणखी एक विशेष बाब म्हणजे बाबाजी जेव्हां जेव्हां विश्रांती करून उठल्यावर केसा पासून पाया पर्यंत स्नान करूनच गुरूद्वाऱ्यात प्रवेश करतात………. सध्या वर्तमान मध्ये संत बाबा कुलवंत सिंघ जी हे 31 वे जत्थेदार च्या रुपाने बारा जानेवारी 2000 पासून या सेवेत कार्यरत आहेत. आज त्यांच्या या सेवेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत.त्या अनुषंगाने 25 जानेवारीला शिख समाजाच्या सर्वोच्च सन्मान ” बाबा जसा सिंघ जी अहलुवालिया अवार्ड” ने निहंघ सिंघ बुढा दल तर्फे अकाल तख्त ( शिख समाजाच्या सर्वोच्च पीठ) तर्फे फार मोठा समारंभ श्री गुरू ग्रंथ साहीब जी भवनात नांदेड येथे प्रदान करण्यात येणार आहेत या मध्ये जगभरातील शिख समाजाच्या मान्यवरांची उपस्थिती लावली जाणार आहे. …… संत बाबा कुलवंत सिंघ जी चा जन्म एक मध्यम वर्गीय कुटुंबात 10-5-67 ला झाला. लहानपणीच वडीलांच्या निधनानंतर त्यांच्या आई ने चार मुलांचा सांभाळ केला बाबाजी तीसऱ्या नंबर चे यांचा मुळ खानदानी व्यवसाय म्हणजे लोखंडी कडे, अंगठ्या तयार करने. बाबाजी चे शिक्षण आय टी आय रेडिओ टीव्ही कोर्स, बारावी शिक्षणासोबतच धार्मिक शिक्षण घेत असताना धार्मिक शिक्षणात परिपुर्ण पणे तयार करणारे यांचे धार्मिक विद्या गुरु ग्यानी हरदीप सिंघ जी होय. बाबाजीनीं गुरूद्वाऱ्यात 7-1-86 चवरदार सेवेची सुरूवात केली व पुढे मीत ग्रंथी,हेड ग्रंथी मग जत्थेदार पर्यंत प्रवास…… जत्थेदार ची सेवा म्हटले तर संपूर्ण जगभरात अशी एक ही सेवा नसेल कारण या सेवेत एक दिवस ही सुट्टी मिळत नाही एवढी कठीण सेवा करत खडतर प्रवास करणे म्हणजे पुर्वजन्माचे काही सत्कर्मच म्हणावे लागेल. याच्या व्यतिरिक्त बाबाजी धार्मिक गुरमुखी लिपी चे शिक्षण देण्याची टकसाल उघडलेली आहे. समाजाच्या शैक्षणिक विकासाच्या दहावी बारावी चांगले गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तेजीत करण्यासाठी दर वर्षी बक्षीस वितरण करतात. अशा आपल्या नांदेडच्या बाबाजीच्या आगळ्यावेगळ्या सेवेची नोंद गिनीज बुक मध्ये होणे आवश्यक आहे. बाबाजीना पंचवीस वर्षे सेवा पुर्तीच्या हार्दिक अभिनंदन व भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा…..
-राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू इलेक्ट्रिकल ट्रैनंर अबचलनगर नांदेड 7700063999*