नांदेड(प्रतिनिधी)-सचखंड श्री हजुर साहिब येथे मुख्य जत्थेदार पदावर काम करणारे संत बाबा कुलवंतसिंघजी यांना आपल्या सेवेची 25 वर्ष पुर्ण झाली आहेत. त्या संदर्भाने गुरु गं्रथ साहिबजींना धन्यवाद देण्यासाठी आणि परमेश्र्वराने संत बाबा कुलवंतसिंघजी यांच्यावर आशिर्वाद कायम ठेवावेत यासाठी गुरमत समागम आणि अखंड पाठ साहिबचे आयोजन करण्यात आले आहे.
संत बाबा कुलवंतसिंघजी यांच्या मातोश्री संत कौरजी आणि बंधू हरजितसिंघजी यांच्यावतीने दि.23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सचखंड श्री हजुर साहिबजी येथे अखंड पाठसाहिबची सुरूवात होणार आहे. अखंड पाठ साहिबची समाप्ती 25 जानेवारी सकाळी 9 वाजता होणार आहे. तसेच 25 जानेवारी रोजी सायंकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेदरम्यान श्री गुरूग्रंथ साहिबजी भवन येथे गुरमत समागममाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान लंगर सेवा सुध्दा होणार आहे.
संत बाबा कुलवंतसिंघजी यांनी सतत 25 वर्ष सचखंड श्री हजुर साहिब येथे गुरु सेवा केली आहे. राज्यात आणि भारतात सुध्दा अनेक गुरुद्वारांमध्ये या कार्यक्रमानिमित्त पुजा-अर्चा सुरू आहे.