नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतले एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 92 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच कंधार बसस्थानकामध्ये बसमध्ये प्रवेश करण्याच्या घाईत असणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दोन तोळ्याचे गंठण किंमत 50 हजार रुपयांचे चोरी झाले आहे.
रामेश्र्वर पिराजी लंगडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 जानेवारीच्या रात्री 3 ते 19 जानेवारीच्या पहाटे 4 वाजेदरम्यान त्यांचे पाटीलनगर तरोडा (खु) येथील घर बंद होते. ते कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून फोडले. घरातील लॉकरमध्ये ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 3 लाख 92 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 39/2025 प्रमाणे दाखल केली आहे. परिविक्षाधिन पोलीस उपनिरिक्षक शिंदे अधिक तपास करीत आहेत.
मीरा जानकीराम केंद्रे या 55 वर्षीय महिला 18 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता कंधार बसस्थानकात बस क्रमांक एम.एच.20 बी.एल.1630 मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांचे पती आणि मुलगी पण सोबत होती. पण गर्दीचा फायदा घेवून कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 2 तोळ्याचे जुने वापरते किंमत 50 हजार रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण चोरले आहे. कंधार पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 16/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार सानप अधिक तपास करीत आहेत.
तरोडा खुर्द येथे 3 लाख 95 हजारांची चोरी; कंधार बसस्थानकात महिलेचे गंठण चोरले
