नांदेड-कुंभमेळा पर्वकाळ निमित्तानेद दक्षिण भारतातील गंगा समजल्या जाणारी गोदावरी नदी ही आम्हा हिंदू समजाच्या दृष्टीने फार पवित्र नदी आहे.तीच्या स्नानाला फार महत्त्व आहे भाजपा आध्यात्मिक आघाडी महानगराध्यक्ष कृष्णा बेरळीकर यांच्या नेतृत्वात माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले व पुढील पाण्याचे नियोजन पाहून मा. अभिजीत राऊत जिल्हाधिकारी साहेब यांनी पाणी सोडण्याचे आश्वासन देखील दिलेले आहे .त्यावेळी अध्यात्मिक आघाडीचे गजानन गावंडे, प्रताप देशमुख, सुजित कानडखेडकर, चंद्रकांत पार्डीकर व इतर सहकारी उपस्थित होते . पौष महिन्यातील दर्श अमावस्या (मौनी अमावस्या )पर्वकाळ स्नान शाहीस्नान तर अतिशय महत्त्वाचे आहे.ही अमावस्या या वर्षी दि 29/1/2025 वार बुधवार ला आहे.या दिवशी अनेक वारकरी,संत महंत ,किर्तनकार,शेकडो हिंदू भाविक जे प्रयागराज येथे जाऊ शकत नाहीत ते सर्व तारातिर्थ धनेगाव तसेच सर्व नदी किनाऱ्यावर येथे गोदावरी काठावर स्नानासाठी येतात.
पण या काळात गोदावरी नदी चे पाणी खुप अस्वच्छ असते .त्या अस्वच्छ पाण्यातच भाविकमंडळी श्रद्धेपोटी स्नान करतात . परंतु जर 27/1/2025 या तारखेला विष्णुपुरी प्रकल्पातील काही पाणी नदीपात्रात सोडले तर घाण पाणी निघून जाईल आणि भाविकांना कुंभमेळ्याच्या धरतीवर स्नानासाठी स्वच्छ पाणी मिळावे