राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेत मुले व मुलींच्या संघास सुवर्ण पदक प्राप्त

 

नांदेड- मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय बेसबॉल (19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि.14 ते 18 जानेवारी, 2025 या कालावधीत पिपल्स कॉलेज, नांदेड व सायंन्स कॉलेज,नांदेड येथे संपन्न झाले.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मा. श्री. महेश वडदकर, निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन मा.श्री.जयकुमार टेंभरे (जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड) मा. श्री. राजेंद्र इखनकर (सचिव, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन), मा.श्री.संजय कुमार (सदस्य, एस.जी.एफ.आय.), श्री.ज्ञानेश काळे (सातारा) ,श्री. आनंदा कांबळे (नांदेड), तांत्रीक समिती सदस्य श्री. इंद्रजित नितनवार (अमरावती), श्री.शंकर शहाणे (परभणी), श्री.संतोष खेंडे (सोलापूर) आदी मान्यवर उपस्थित होते.

समारोप कार्यक्रम प्रसंगी मा.महेश वडदकर म्हणाले की, शालेय जिवनात खेळ हा अतिशय महत्वाचा घटक असुन खेळाडूंनी शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही उल्लेखणीय कार्य करुन करीयर घडवावे व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवावी असे सांगीतले.

या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत संपुर्ण भारतातून 15 मुले , 14 मुली असे एकण 29 मुला-मुलींच्या संघानी सहभाग घेतला असून यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या संघाचे वर्चस्व राहीले आहे. स्पर्धेचा अंतिम निकाल 19 वर्षे मुले- प्रथम- महाराष्ट्र, द्वितीय- छत्तीसगड व तृतिय- दिल्ली तर 19 वर्षे मुली मध्ये प्रथम- महाराष्ट्र, द्वितीय- छत्तीसगड व तृतिय- पंजाब या संघाने प्राविण्य प्राप्त केले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या विजयी संघात 19 वर्षे मुले- शुभम धोत्रे (पुणे), श्रीवर्धन बनसोडे (परभणी), निखील माने (पुणे), शिवराज शिंदे (पुणे), अदित्य गवळी (जळगांव), प्रज्वल पाटील (कोल्हापूर), दक्ष रामटेके (यवतमाळ), सार्थक गावडे (मुंबई), तौफिक शाहू (अमरावती), रणवीर जाधव (पुणे), युवराज मांडकर, विशाल जारवाल (छ.सं.नगर), सक्षम पवार (सातारा), अदित्य चव्हाण (नांदेड), संस्कार संकपाळ (सांगली), उदय रेटवडे (पुणे) तर 19 वर्षे मुलीच्या संघात – दुर्वा भोंगळे (पुणे), रत्नमाला चौर (बीड), संस्कृती कुंभार (सांगली), अक्षदा महाजन (जळगांव), पंकजा चौर (बीड), सानिका नलवडे (पुणे), मानसी पाटील (जळगांव), स्मृती सांगळे (पुणे), रोहीणी नवटक्के (लातूर), अनिशा देवकर (पुणे), अमृता शिंदे (जालना), अनुष्का पुल्लरवार (नागपूर), श्रृध्दा गावडे (पुणे), श्रध्दा कांबळे (पुणे), तन्वी फलफले (पुणे), राणी जाधव (नांदेड) या खेळाडूंचा समावेश होता.

या स्पर्धेकरीता पंच म्हणुन श्री.गणेश बेतुडे (छ.संभाजीनगर),आकाश साबणे (परभणी), मनिष मोकल (मुंबई शहर), राहुल खुडे (लातूर), श्री.विशाल कदम (हिंगोली), रोहित ठाकोर (पुणे), पवन सैरासे (अमरावती), प्रफुल वानखेडे (बुलढाणा), गौस शेख (नांदेड), हरिश डोनगांवकर (नांदेड), बालाजी गाडेकर (नांदेड), सायमा बागवान (परभणी), अर्चना कोलोड (नांदेड) आदीनी काम पाहीले.

सदर स्पर्धा यशस्वी करणेसाठी मा.जयकुमर टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, श्री.राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी) श्री. विपुल दापके (क्रीडा अधिकारी), वरिष्ठ लिपीक श्री.संतोष कनकावार, कनिष्ठ लिपीक श्री दत्तकुमार धुतडे, श्री. संजय चव्हाण, श्री. आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, वैभव दोमकोंडवार, ज्ञानेश्वर सोनसळे मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व बेसबॉल असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदिनी सहकार्य केले आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!