नांदेड(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीसांकडे असणारा ई-चालन करण्याचा अधिकार काढून घेतला आहे. याबद्दल ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट कॉंगे्रसचे अध्यक्ष बलमलकितसिंघ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद व्यक्त केले आहे. या संदर्भाने ट्रान्सपोर्ट टी.व्ही.ने आणि काही वृत्तमान पत्रांनी ही बातमी प्रसारीत केली आहे. पण शासनाच्या संकेतस्थळावर या संदर्भाचा जीआर शोधला असता तो काही दृष्टीपथात आला नाही.
राज्य शासनाने महाट्रॅफिक ऍप तयार करून पोलीसांना त्यांच्याकडे दिलेल्या मशिननुसार किंवा त्यांच्याकडे असलेल्या स्वत:च्या मोबाईलवरून आणि इंटरस्पेटर गाड्यांमध्ये असलेल्या संगणक कॅमेऱ्यांवरून वाहनांचे फोटो घेवून ते महाट्रॉफिक ऍपवर लोड केल्याबरोबर गाडीच्या क्रमांकावर नोंदणीकृत असलेल्या मोबाईलवर त्याचा दंड दाखवला जात असे. याशिवाय एखादी गाडी बाहेर फिरत असतांना कोणत्याही ट्रॉफिक पॉईंटवर वाहतुक पोलीसांनी ती गाडी रोखून तिचा तपासणी करतात. त्या गाडीवर मागे लागलेल्या फाईनचा शोध घेतात. फाईन जर जास्त असेल आणि गाडी चालकाकडे तेवढे पैसे नसतील तर त्याच्याकडून मोदक घेतले जातात आणि त्याची सुटका होते. असे अनेक व्हिडीओ पुरावे घेवून ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट कॉंगे्रसने शासनाकडे याची तक्रार केली होती. अनेक ठिकाणी वाहतुक पोलीस आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून गाडीचे चित्र घेतात आणि त्यावरही ई-चालनद्वारे दंड आकारला जातो. उदाहरणात झेब्रा क्रॉसींगवर एक इंच सुध्दा गाडी पुढे आली असेल तरी त्या दुचाकीला व इतर वाहनांना दंड लावला जातो. हायवेवर गाडी चालवत असतांना बऱ्याच रस्त्यांवर वाहनाची वेग मर्यादा लिहिलेली नाही. पण पुढे कुठे तरी इंटरस्पेटर गाडी असते आणि त्या गाडीच्या कॅमेऱ्यामध्ये वाहन वेगाच्या मर्यादेपेक्षा 0.1 एवढा वेग जास्त असला तरी त्याला दंड लावला जातो. वाहन वेग आणि त्यावरचे नियंत्रण हे सर्व चालकाची जबाबदारी आहे. हे खरे आहे. पण ज्या ठिकाणी वाहन वेग मर्यादा लिहिलेली नाही आणि रस्ता चांगला असेल तर वाहन चालक आपली वेग मर्यादा वाढवतोच. अशा परिस्थितीत सुध्दा त्याला दंड द्यावा लागतो.
ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट कॉंगे्रसने या संदर्भाने अनेक पुरावे जमा करून सरकारकडे दिले होते. सरकारने त्यावर एक समितीची स्थापना केली होती आणि त्या समितीने दिलेल्या अहवालानंतर शासनाचा महाट्रॉफीक ऍप हटविण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या संदर्भाने ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट कॉंगे्रसचे अध्यक्ष बलमलकितसिंघ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद व्यक्त केले आहे. या संदर्भाची बातमी काही वर्तमानपत्रांनी आणि ट्रान्सपोर्ट टी.व्ही.ने प्रसारीत केली आहे. त्यात सुध्दा बलमलकितसिंघ बोलतांना दिसतात. ट्रान्सपोर्ट टी.व्ही.च्या या बातमीला चार दिवसात लाखो लोकांनी पाहिले आहे. त्यावरील कॉमेंटसमध्ये मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले आहेत. त्याच कॉंमेंटसमध्ये ही बातमी पाहत असतांना सुध्दा ई-चालन केले जात आहे असे कॉंमेंटस सुध्दा आहेत. शासनाच्या संकेतस्थळावर या संदर्भाच्या शासन निर्णयाचा शोध घेतला असता तो काही दृष्टीपथात पडला आहे.