नांदेड(प्रतिनिधी)-एका 40 वर्षीय महिलेच्या घरासमोरून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोन्याचे गंठण तोडून पळ काढला आहे. त्या गंठनची किंमत 60 हजार रुपये आहे.
सौ.छाया दत्ता ढाकणे या 40 वर्षीय महिला 16 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजेच्यासुमारास बोधीसत्वनगर येथे घरासमोर उभ्या असतांना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण तोडून पळ काढला आहे. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 32/2025 नुसार दाखल केली असून सहाय्यक पोलीस निरिक्षक मस्के अधिक तपास करीत आहेत.