नांदेड(प्रतिनिधी)-गोवंश जातीचे बैल घेवून जाणाऱ्या गाड्यांना आडविण्याचा प्रयत्न केला असता त्या गाडी चालकांनी पोलीसांच्या अंगावर गाडी टाकून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार तामसा येथे घडला आहे.
पोलीस अंमलदार देविदास नामेदव जोंधळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर 2.30 वाजेच्यासुमारास तामसा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅरीकेटींग लावून वाहने तपासात असतांना एका वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांना थांबण्यासाठी इशारा केला, बॅटरीचा उजेड दाखविला. त्यावेळी त्यांनी वाहनाचा वेग कमी करून पुन्हा वाहन जोरात चालवून पोलीसांच्या अंगावर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या वाहनामध्ये 15 जनावरे दाटीवाटीने बांधून वाहतुक होत होती.
तामसा पोलीसांनी वाहन चालक शेख फैजान शेख निसार कुरेशी (18) रा.हदगाव आणि शेख मोहसिन शेख शेरु रा.हदगाव या दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 9/2025 दाखल केला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 109 सह अनेक कलमे जोडली आहेत. तसचे प्राणी संरक्षण अधिनियम जोडला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक नरवटे हे करीत आहेत.