नांदेड(प्रतिनिधी)-शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या गल्लीत 12 जानेवारी रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास दोन जणांनी एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली आहे.
बिपीनचंद्र कमलाकर दंडवते हे 12 जानेवारी रोजी पावडेवाडी नाकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे लघूशंका करून परत आले असतांना दोन अज्ञात माणसांनी त्यांना थांबवून मारहाण केली आणि त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 11 हजार 300 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 14/2025 प्रमाणे दाखल केली असून सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्रुबा घाटे अधिक तपास करीत आहेत.