नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील सामान्य शाळेत इयत्ता 1 ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळणेसाठीचे अर्ज मुख्याध्यापकांनी महाडिबीटी प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.
शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांप्रमाणे शालांत पूर्व शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यासाठी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये महाडिबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज स्विकारण्याची सुविधा उपलब्ध करुन आलेली आहे. यासाठी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये सामान्य शाळेतील इयत्ता 1 ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अर्ज सादर करावेत. यासाठी शाळास्तर मुख्याध्यापकांनी युजर आयडी-pre_school Udise no_ principal पासवर्ड- pass@123 याप्रमाणे दिला आहे.