9 फेब्रुवारीपर्यंत महारेशीम अभियानाचे आयोजन
नांदेड :- सन 2024-25 मध्ये समुहाने मनरेगा, सिल्क समग्र 2 योजनेअंतर्गत तसेच वैयक्तीक नवीन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महारेशीम अभियान 2025 दिनांक 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे.
तरी नवीन तुती लागवड करण्यासाठी ईच्छूक असलेल्या शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, रामाकृष्णा इमारत, दुसरा मजला, एमएफ होंडा शोरुमच्या बाजूला, जॉन डिअर ट्रक्टर सर्व्हिस सेंटरच्या समोर हिंगोली रोड, नांदेड दूरध्वनी क्रमांक 9763689032, 9423437026, 7588151237, 7798213333 वर संपर्क करावा. तसेच तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती, कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधून नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय नांदेड यांनी केले आहे.