नांदेड(प्रतिनिधी)-किनवट तालुक्यातील मांडवा या जंगलात सागवान झाडांची तोड करून चोरून नेणाऱ्या दोन जणांना किनवट वन विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोन सागवान चोर पळून गेले आहेत.
11 जानेवारी 2025 रोजी किनवट तालुक्यातील मांडवा (की) या जंगलात नेहमीप्रमाणे गस्त करत असतांना वनरक्षकांना सागवानाची झाडे तोडण्याचा आवाज आला. त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता शेख अलाउद्दीन शेख उस्मान रा.गंगानगर किनवट हा सागवान तस्कर एका सागवान झाडाला पुर्णपणे तोडून त्याचे कटसाईज लाकूड तयार करतांना रंगेहात सापडला. तसेच यावेळी त्याची मदत करणारे दोन सागवान तस्कर शेख करीम शेख महेबुब रा.हमाल कॉलनी किनवट आणि शेख सोहेल शेख अखतर रा.सुभाषनगर किनवट हे पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या एका विरुध्द आणि पळून गेलेल्या दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 1/2025 दाखल करण्यात आला. सागवान चोरट्यांनी कटकरून ठेवलेले सागवानाची तिन लाकूड ज्या लाकडांची मोजणी 0.249 घ.मी. आहे. ही लाकडे जप्त करण्यात आली आहे. सोबतच एक बारशी आणि एक करवत जप्त करण्यात आली आहे. चोरट्यांनी चोरलेल्या सागवानाची किंमत 4144 रुपये आहे.
उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक जी.डी.गिरी, वन परिक्षेत्र अधिकारी बी.एल.राठोड यांच्या मार्गदर्शनात वन परिमंडळ अधिकारी एम.एन.कत्तुलवार, के.पी.मुळे, एम.के.केंद्रे, आर.बी.दांडेगावकर, बी.एस.झमलपवाड, महेश बोरडे, ओम शिंदे, एस.एन.बुरके, वनसेवक नुर मामु, वाहन चालक बाळकृष्ण आवले यांनी ही कार्यवाही केली.