छत्तीसगडमध्ये पत्रकाराची झालेली निर्मम हत्या माझा नातलग असतांना माझ्याविरुध्द बातम्या प्रसिध्द करतो म्हणून केली अशी माहिती त्या प्रकरणाच्या तपासासाठी तयार करण्यात आलेल्या एसआयटीने प्रसारीत केली आहे. या प्रकरणाची क्षणा-क्षणाची माहिती एसआयटीने सार्वजनिक केली आहे. त्यात विजयापुरचे पोलीस अधिक्षक डॉ.जितेंद्र यादव यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, पत्रकार यांनी भरपूर मेहनत घेवून या हत्याकांडास उघड केले. खरे तर मुकेश चंद्राकरच्या हत्येचे खलबत 27 डिसेंबरलाच शिजले होते, 31 डिसेंबरला त्याचा अंत करायचा होता. पण प्रत्यक्षात हत्या घडली 1 जानेवारी रोजी.
छत्तीसगडमधील दबंग पत्रकार मुकेश चंद्रकार नक्षलवादी भागात जन्म घेवून शरणार्थी शिबिरांमध्ये जगून मोठा झाला आणि पत्रकारीतेकडे वळला. त्यांचे एक बंधु सुध्दा मध्यप्रदेशमध्ये पत्रकार आहेत. वडील लहानपणीच मरण पावले आणि आई सन 2015 मध्ये अंगणवाडी सेविकेची नोकरी करत करत दोन भावांना सोडून निघून गेली. पत्रकारीतेत काम करतांना ओनली फॉर ट्रुथ या विचाराच्या आधारे पत्रकारीता सुरू केली आणि कमी वेळेतच मुकेश चंद्राकर नामांकित व्यक्तीमत्व झाले. त्यांचेच नातलग असलेल्या सुरेश चंद्रकरला एका रस्त्याचा मिळालेला ठेका 50 कोटीचा 110 कोटी झाला आणि रस्त्यावर पाय ठेवला तर पाय बर्फात घुसेल अशा प्रकारे तो रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्याची बातमी व्हिडीओसह तयार करून आपल्या इतर सहकारी पत्रकारांच्या मदतीने मुकेश चंद्राकरने डिसेेंबर महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसात प्रसिध्द केली. दि.25 किंवा 26 डिसेंबर 2024 रोजी छत्तीसगड प्रशासनाने त्या बातमीच्या आधारावर ठेकेदाराची चौकशी लावली. या कामाचा ठेकेदार सुरेश चंद्राकर होता. त्याचा भाऊ रितेश चंद्राकर, दिनेश चंद्राकर आणि सेवक महेंद्र रामटेके या चौघांनी मिळून मुकेश चंद्राकरच्या हत्येचा कट रचला. यातील रितेश चंद्राकर हा नातलगांसह मुकेश चंद्राकरचा अत्यंत जवळचा मित्र होता.
1 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.20 ते 8.25 एवढ्या 5 मिनिटाच्या दरम्यान रितेश चंद्राकरने मुकेश चंद्राकरला दोन कॉल केले आणि त्या कॉलनंतर मुकेश चंद्राकर चट्टान पाडा बाडा येथे पोहचले. त्या ठिकाणी एकूण 17 खोल्या आहेत. त्यातील खोली क्रमांक 11 मध्ये या सर्वांनी एकत्रितपणे जेवण घेतले आणि त्यानंतर बातमीच्या संदर्भाने वाद सुरू झाला. तेंव्हा रितेश चंद्राकर आणि महेंद्र रामटेके यांनी मुकेश चंद्राकरला लोखंडी रॉडने अनेक जागी मारले. त्यात त्यांना अनेक जखमा झाल्या, त्यांचे हृदय फाटले, लिव्हरचे चार तुकडे झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
2 जानेवारी रोजी या बाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीसांनी नेहमी प्रमाणे आपल्याच विशेष प्रतिक्रियेनुसार प्रतिक्रिया दिल्या. तेंव्हा अनेक पत्रकार पोलीस महानिरिक्षकांकडे गेल आणि तेथून या गायब झालेल्या मुकेश चंद्राकरच्या शोधाची सुरूवात झाली. पोलीसांनी मुकेश चंद्राकरच्या दोन दुरध्वनीचे लोकेशन तपासण्यात आले, जीमेलचे शेवटचे लोकेशन तपासण्यात आले. तेंव्हा हे दोन्ही शेवटचे लोकेश चट्टानपाराबाडा येथील दाखवत होते. पण त्यानंतर मोबाईलचे लोकेशन नेल्सनार नदीच्या जवळ असलेल्या झुडूपांमध्ये दाखवत होते. दरम्यान पोलीसांनी शंकेच्या आधारावर दिनेश चंद्राकर आणि महेंद्र रामटेके यांना ताब्यात घेतलेलेच होते आणि मग त्यांची चौकशी सुरू झाली. 3 जानेवारी रोजी दिनेश चंद्राकरने सर्वप्रथम मुकेश चंद्राकरची हत्या केल्याचे कबुल केले. पोलीसांनी रितेश चंद्राकर हा 2 जानेवारी रोजी रायपूर ते दिल्ली जाण्यासाठी विमानतळवर असतांना त्याला अटक केली आणि दिनेश चंद्राकरला दवाखान्यात उपचार घेण्याचे नाटककरतांना अटक केली. त्यानंतर पुढची माहिती महेंद्र रामटेकेने दिली. खोली क्रमांक 11 मध्ये त्याची हत्या केल्यानंतर त्याचे कपडे, फोन, कशापध्दतीने फेकले आणि नष्ट केले याची माहिती सांगितली. या सर्व बाबीची पोलीसांनी पुन्हा एकदा उभारणी केली आणि घडलेली घटना पुराव्यांमध्ये जोडली. सुरेश चंद्राकरला ओडीसा आणि तेलंगणा पोलीसांच्या मदतीने हैद्राबाद येथे पकडले.
या सर्व प्रकरणाची माहिती सुरेश चंद्राकर ताब्यात आल्यानंतर सविस्तरपणे आली. त्याला विचारण्यात आले 27 डिसेंबर रोजी एवढी मोठी रक्कम बॅंकेतून का काढली होती. त्याने सांगितले आहे. मुकेश चंद्राकरला मारण्याचा कट तयार होता. त्याला 31 डिसेंबर रोजीच मारायचे होते. कारण तो माझा नातलग असतांना सुध्दा माझ्या विरुध्द बातम्या तयार करत होता. म्हणून ती रक्कम काढून तयार ठेवली होती. पण 31 डिसेंबर रोजी तो आला नाही म्हणून त्याचे काम तमाम 1 जानेवारी रोजी करण्यात आले. सध्या हे 4 मारेकरी पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणातील एसआयटीने मुकेश चंद्राकरच्या गायब झाल्यापासून ते आजपर्यंत क्षणा-क्षणाची माहिती सार्वजनिक केली आहे.
तरी पण मुकेश चंद्राकरच्या मृत्यूचा हिशोब कोण देणार. खऱ्या बातम्या करणे हे मृत्यूसाठी कारण होवू शकते हे यातून समोर आले. विशेष करून नातलगांविरुध्द बातम्या लिहितांना पत्रकारांनी जास्त दक्षता घेण्याची गरज आहे. कारण नातलग असून माझ्याविरुध्द बातमी तयार करतो. म्हणून सुरेश चंद्रकार आणि त्याच्या भावांनी मिळून मुकेश चंद्राकरची हत्या केलेली आहे. भारतीय स्वातंत्र्यांने दिलेल्या आर्टीकल 19 ला विसरुन, आपल्या जीवाची पर्वा करून बातम्या करणे आवश्यक आहे काय अशी विचारणा आम्हाला करायीच आहे.
संबंधीत बातमी…
पत्रकाराच्या मृतदेह काढण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी सेफ्टीक टॅंक फोडू दिला नव्हता