नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील रेल्वे रुळांच्या पलिकडे आज बऱ्याच मटका बुक्कींवर छापा टाकण्यात आला. त्यात झालेल्या पळापळीत आम्हाला सुध्दा एक मटक्याची चिठ्ठी रस्त्यावर पडलेली सापडली. म्हणजे रेल्वे रुळांपलिकडे मटका सुरूच आहे.
आज दुपारी 1 वाजेच्यासुमारास काही पोलीसांनी रेल्वे रुळांपलिकडच्या भागात अर्थात नांदेड शहरातील पश्चिम भागाकडे धावपळ झाल्याची महिती मिळाल्यानंतर आम्ही त्याचा मागोवा केला. तेंव्हा असे समजले की काही मटका बुक्कींवर धाड टाकण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही लिहिलेल्या 28 डिसेंबर 2024 आणि 2 जानेवारी 2025 लिहिलेल्या बातम्या खऱ्याच आहेत. याची पुष्ठी आज तिसऱ्यांदा होत आहे. कारण आम्ही 2 तारखेला छापलेल्या बातमीच्या दिवशी जुगार कायद्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यात 1/2025 क्रमांकाचा गुन्हा जुगार कायद्यान्वये दाखल झाला. तसेच 3 जानेवारी रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 3/2025 मध्ये 4 आरोपींची नावे आहेत. त्यानंतर 5 जानेवारी रोजी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 7/2025 मध्ये 7 आरोपींची नावे आहेत. ही सर्व मटका जुगाराचीच कार्यवाही आहे.
आज 9 जानेवारी रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या धावपळीचा मागोवा घेण्यासाठी गेलो असतांना त्या ठिकाणी रस्त्यावर एक मटक्याची चिठ्ठी सापडली आहे. श्री.इंग्रजी अक्षरात डी.ओ.9 असे लिहिलेले आहे या बाबत मटका व्यवसायातील जाणकारांना विचारणा केली असतांना श्रीदेवी डे ओपन असा त्यांचा अर्थ आहे आणि 9 आकडा म्हणजे आजची तारीख आहे असे त्या तज्ञाने सांगितले आहे. म्हणजे आम्ही मांडलेली बेकायदेशीर कामकाजाची बाजू योग्यच आहे.