नांदेड(प्रतिनिधी)-डिसेंबर महिन्यात चोरी गेलेली दुचाकी गाडी नांदेड ग्रामीण पोलीसांनी जप्त करून सिडको मधील एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलीसांनी अभिलेखावरील चोरीला गेलेल्या दुचाकीसह एकूण 4 दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
दि.11 डिसेंबर रोजी सिडको मधून श्रीनिवास रामराव कोलंबिकर यांची दुचाकी त्यांचीच दुकान श्रीपाद स्केल सर्व्हिसेस, वजन-माप काट्याचे दुकान येथून चोरीला गेली होती. या संदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 14/2025 दि.4 जानेवारी 2025 रोजी दाखल करण्यात आला होता.
नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे, महेश कोरे, पोलीस अंमलदार मोरे, जाधव, विक्रम वाकडे, माने, कलंदर, कल्याणकर, सिरमलवार, माळगे यांनी संत कबिरनगर सिडको येथे राहणारा मनोज दिनकर सदार (38) यास ताब्यात घेतले. पोलीसांनी श्रीनिवास कोलंबिकर यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.झेड.7927 ही 40 हजार रुपये किंमतीची गाडी मनोज सदारकडून जप्त केली. त्यानंतर पोलीसांनी त्याच्याकडून इतर चोरीच्या तिन दुचाकी गाड्या असा एकूण 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.