नांदेड(प्रतिनिधी)-राज्याच्या गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यभरात 491 सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ या पदावर सरळ सेवेने नियुक्ती देण्यात आली आहे. या आदेशावर गृहविभागाचे उपसचिव दत्तात्रय कदम यांची स्वाक्षरी आहे. 491 नियुक्त्यांमध्ये नांदेड जिल्ह्यासाठी 20 नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
पहिल्यांदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ या परिक्षा झाल्या आणि त्यातील पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात राज्यात एकूण 491 सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ पदावर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
491 पैकी नांदेड जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आलेले सहाय्यक सरकारी अभियोक्ता पुढील प्रमाणे आहेत. ऍड.विरेंद्र विजयराव देशमुख, ऍड. कैलास मच्छिंद्र गिरी, ऍड. मंगलमुुर्ती किशनराव मांडे, ऍड. निखिल मनोहर मकदुम, ऍड.सचिव बाळु पवार, ऍड. चंद्रभागा बापुराव काळे, ऍड. शिवकुमार रणजित शिलेदार, ऍड. प्रसन्ना किशोर जांगडे, ऍड. गणेश विश्र्वनाथ घुगे, ऍड. प्रज्ञा मधुकर पाईकराव, ऍड. सागर सतिशराव पाटील, ऍड. सुजाता प्रकाशराव आचमारे, ऍड. कल्याणी सुनिलराव कुलकर्णी, ऍड.अस्मिता एकनाथराव मोरे, ऍड. भक्ती अरुण लाठकर, ऍड.मोमीन तौफिक अहेमद जलालोद्दीन, ऍड.संगिता विश्र्वनाथ गोपाळे, ऍड.स्वप्नील संपतराव पवार, ऍड मनिषा जयप्रकाश गायकवाड यांचा समावेश आहे. राज्यातील सर्व नवनियुक्त सहाय्यक सरकारी अभियोक्तांचे वास्तव न्युज लाईव्ह अभिनंदन करीत आहे.
राज्य शासनाच्या गृहविभागाने जारी केलेली 491 पदस्थापनेची पिडीएफ संचिका वाचकांच्या सोयीसाठी बातमीसह जोडली आहे.