नांदेड,(प्रतिनिधी)-रेल्वे रुळांच्या पलीकडे असलेल्या मटक्याच्या मालक स्वामीचे कार्यालय मालेगाव ता. अर्धापूर येथे असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. सोबतच स्वामीं हे एक लाख रुपयांमध्ये मटका व्यवसाय चालवण्याचे पोट भाडेकरू आहेत अशी सुद्धा माहिती समोर आली आहे.
रेल्वे रुळांच्या पलीकडे सुरू असलेल्या 36 मटक्यांच्या बुक्क्यांचे मालक स्वामी यांचे मुख्य कार्यालय अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. म्हणूनच मुख्य कारभार मालेगाव येथून संचालित होतो. त्या कारभाराचा त्याचा व्याप रेल्वे रुळांपर्यंत आहे. काही दिवसापूर्वी ह्या 36 मटका बुक्या कोणी दुसऱ्याच्या होत्या. त्यात दोन जण हा कारभार पाहत होते. पण स्वामी ने कारभार त्या दोघांना दरमहा एक लाख रुपये देऊन खरेदी केल्याची माहिती हाती आली आहे. त्यानंतर मूळ मालक आणि स्वामी यांच्यात सुद्धा वास्तव न्यूज लाईव्हच्या बातमी नंतर वाद सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारे 36 मटका बुक्क्यांचा व्यवहार सुरू आहे कोणाचे या बुक्क्यांवर का लक्ष नाही,हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.
संबंधित बातमी….