नांदेड(प्रतिनिधी)-नवीन वर्ष सुरू होण्याच्या पुर्व संध्येला माळेगाव यात्रेत चार जणांनी 19 वर्षीय युवकाचा खून केल्याचा प्रकार घडला आहे.
मिलिंद गणपती गर्जे रा.भिमवाडी सिडको यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा मनोज मिलिंद गर्जे (19) यास परमेश्र्वर उर्फ बबलू नारायण जोंधळे, हर्ष राजू हनमंते, रोहित उर्फ चिंटू दिलीप धोतरे आणि यश रायबोले सर्व रा.भिमवाडी सिडको नांदेड यांनी संगनमत करून त्याला माळेगाव यात्रेत घेवून गेले आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून धारधार शस्त्राने मारहाण करून त्याचा खून केला आहे. माळाकोळी पोलीसांनी या प्रकरणी चार जणांविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 3(5) प्रमाणे गुन्हा क्रमांक 1/2025 दाखल केला आहे. माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.