नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस रेजिंग डे निमित्ताने आज सकाळी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी आयोजित केलेल्या दौडला तिरंगा झेंडा दाखवला आणि ते सुध्दा त्यात सहभागी झाले.
नांदेड पोलीस दलातर्फे 2 ते 8 जानेवारी या कालखंडात पोलीस स्थापना दिवस साजरा केला जातो. त्यात आज पहिल्या दिवशी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी दौडमध्ये सहभागी झालेल्या युवक, युवती, पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, न्यु फोर्सद्य ऍकॅडमीचे विद्यार्थी, पोलीस मित्र यांना हिरवी झेंडी दाखवून त्यांना रवाना केले. पोलीस अधिक्षक स्वत: सुध्दा या दौडमध्ये सहभागी झाले होते.
ही दौड पोलीस अधिक्षक कार्यालयातून सुरू झाली, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गांधी पुतळा, गुरुद्वारा चौक, महाविर चौक, वजिराबाद चौक, तिरंगा चौक या मार्गाने पोलीस मुख्यालयात समाप्त झाली. या प्रसंगी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्यासह अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय आणि शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थिती होते.