नांदेड (प्रतिनिधी) – गेल्या ३० वर्षांपासून एकाहून एक दर्जेदार आणि विक्रमी यश प्राप्त करणाऱ्या नाटकांची निर्मिती करणारी महाराष्ट्रातील नामांकित नाट्य संस्था ‘ आई क्रिएशन्स,नांदेड ‘ च्या वतीने नाट्य,सिनेमा आणि मालिका क्षेत्रात आपले भवितव्य घडऊ इच्छिणाऱ्या १२ ते ५० ह्या वयोगटातील इच्छुक पुरुष,स्त्री आणि बाल कलावंतांसाठी नांदेड येथे ‘ आंबेडकरवादी नाट्य प्रशिक्षण शिबीर ‘ आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे मुख्य संचालक डॉ. विलासराज भद्रे ह्यांनी दिली आहे.संस्थेचे हे दुसरे शिबीर आहे.
सदरील शिबीर १ जानेवारी ते १४ जानेवारी २०२५ असे १४ दिवसांचे असून शिबीर निःशुल्क आहे.
ह्या शिबिरात नाट्य लेखन,दिग्दर्शन,अभिनय,नेपथ्य, रंगभूषा,वेशभूषा,संगीत आदी नाटकाच्या सर्व तांत्रिक बाबींवर महाराष्ट्रातील नाट्य,सिने क्षेत्रातील ख्यातनाम नाट्य प्रशिक्षक मार्गदर्शन करतील.शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व कलावंतांना प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच संस्थेकडून निर्मिती होणाऱ्या विविध नाटके,चित्रपट,मालिकेत काम करण्याची संधी मिळणार आहे.आणि नाट्य, सिनेमा,मालिकेत काम करण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल.कलावंतांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
ह्या शिबिरात प्रवेश घेण्यासाठी मुख्य संयोजक डॉ. विलासराज भद्रे मोबाईल नंबर 9890145726 वर त्वरित संपर्क साधावा किंवा अमृत क्लिनिक, मेन रोड श्रावस्तीनगर,नांदेड येथे प्रत्यक्ष भेटावे असे आवाहन शिबीर समन्वय समितीने केले आहे.