रामप्रसाद खंडेलवाल
भारताच्या ईतिहासात पहिल्यांदा असे घडले की, दिल्लीमध्ये राहणाऱ्या माजी पंतप्रधानांची अंतिमक्रिया सर्वसामान्य लोकांची अंतिमक्रिया होते त्या ठिकाणी करण्यात आली. काही जणांचे मत आहे की, डॉ.मनमोहनसिंघ यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदला घेतला आणि तो सुध्दा तुच्छ स्वरुपात की, डॉ.मनमोहनसिंघ यांना दोन गज जमीन अंतिमक्रियेसाठी दिली नाही. काय साध्य केेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल काही लोक म्हणतात की, डॉ.बी.आर.आंबेडकरांचा विषय, संत मिराबाईचा विषय मागे पडावा यासाठीच हा खटाटोप करण्यात आला. शासनाची वृत्तवाहिनी असलेल्या दुरदर्शनने एका मिनिटासाठी सुध्दा माजी पंतप्रधान मनमोहनसिंघ यांची अंतिमयात्रा दाखविली नाही. गल्लीत सुध्दा एवढ्या निचतेचा विचार कोणी करत नसेल. भारतातच नव्हे तर जगात सुध्दा या प्रकरणाची छी थु होत आहे.
परवा 26 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंघ यांना त्रास झाला आणि त्यांना दवाखान्यात देण्यात आले. पण दुर्देवाने अर्ध्या तासातच त्यांचा मृत्यू झाला. जगाला दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे अंतिम दर्शन घेण्यासाठी डॉ.मनमोहनसिंघ यांच्या घरी गेले. मारोती 800 चे मालक डॉ.मनमोहनसिंघ हे अगोदर प्राध्यापक होते, त्यांच्या पत्नी गुरचरणकौर सुध्दा प्राध्यापक होत्या. त्यांना तीन मुली आहेत आणि त्या सर्व विदेशात राहतात आणि सन्मानाच्या दृष्टीने चांगलेच कार्य करतात. त्यानंतर डॉ.मनमोहनसिंघ यांच्या घरात रिघ लागली. माजी पंतप्रधान असल्यामुळे त्यांची अंतिमक्रिया रक्षामंत्रालयाने करणे हा प्रोटोकॉल आहे. त्याप्रमाणे त्यांना सुचना देण्यात आली. दिल्लीतील निगमबोधघाट येथे त्यांची अंतिमक्रिया करण्यात येईल. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी माजी आजी इंदिरा गांधी आणि माझे वडील राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळामधील कोणतीही जागा अंतिमक्रियेसाठी द्यावी अशी विनंती स्वत:च्यावतीने आणि कॉंगे्रस पक्षाच्यावतीने केली. जेणे करून त्याच ठिकाणी त्यांचे मेमोरियल उभारण्यात येईल. याला सुध्दा केंंद्र सरकारने प्रतिसाद दिला नाही आणि दि.27 तारखेच्या रात्री 12 वाजेच्या अगोदर असे जाहीर केले की, निगमबोधघाटवरच अंतिमक्रिया होईल. पण त्यांचे स्मारक बनविले जाईल त्यासाठी जागा सुनिश्चित करायला वेळ लागणार आहे.
काल दि.28 डिसेंबर रोजी सकाळी डॉ.मनमोहनसिंघ यांचा मृतदेह त्यांच्या घरातून कॉंग्रेस कार्यालयात आणला. त्यानंतर सकाळी 10 वाजेच्यासुमारास त्यांची अंतिमयात्रा सुरू झाली. निगमबोधघाट येथे सुध्दा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा वाहन ताफा आल्यामुळे सर्वसामान्य माणसांना तर तेथे जाता आलेच नाही. एवढेच नव्हे तर डॉ.मनमोहनसिंघ यांच्या चितेला अग्नी देण्यासाठी त्यांच्या नातूना शोधून आणावे लागले. एवढेच नव्हे तर त्यांच्या घरच्या मंडळींना सुध्दा तेथे पोहचता आले नाही. शासनाची वृत्तवाहिनी दुरदर्शनने एक मिनिटासाठी सुध्दा डॉ.मनमोहनसिंघ यांच्या अंतिमक्रियेचे दृश्य दाखवले नाही. ज्या प्रमाणे लोकसभा आणि राज्यसभा चालते. त्यातील कॅमेऱ्यांचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे या अंतिक्रियेत सुध्दा घडले. विशेष म्हणजे गार्ड ऑफ ऑनर देतांना आणि त्यांच्या शरिरावर गुंडाळलेला तिरंगा ध्वज त्यांच्या पत्नी गुरचरणकौर यांना देतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे इतर मंत्री उभे सुध्दा राहिले नाहीत. भुटान नरेश(राजा) या अंतिमक्रियेसाठी आले होते. ते भारताचे नसतांना सुध्दा भारताजवळ असल्यामुळे त्यांना भारतातील सर्व पध्दती त्यांना माहित होत्या. ते दोन्ही वेळेस उभे राहिले. पण भारताचे पंतप्रधान मात्र उभे राहिले नाहीत. एवढेच नव्हे तर भुटान नरेश हे या अंतिम संस्कारासाठी आले आहेत हे सुध्दा जनतेला खुप उशीरा कळले. नाही तर प्रोटोकॉलप्रमाणे भुटन नरेश यांचा भारत दौरा केंद्र शासनाने जाहीर करायला हवा होता.
जाणकारांच्या आणि विश्लेषकांच्या मते नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना डॉ.मनमोहनसिंघ हे भारताचे पंतप्रधान होते. एकदा गुजरातच्या कार्यक्रमात पंतप्रधानासमोर त्यांनी पाकिस्तानला धमकी दिली होती की, माझ्या देशाच्या पंतप्रधानांबद्दल कोणताही गैर शब्द मी सहन करू घेणार नाही. हे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ.मनमोहनसिंघ यांच्या अंतिमक्रियेत टाकलेल्या वावड्या का आवडल्या असतील. याचा विचार केला आणि तो मांडायचा आहे तेंव्हा असे दिसते की, ज्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2014 मध्ये पंतप्रधान होण्याची वेळ आली होती. त्यावेळेस डॉ.मनमोहनसिंघ यांनी सांगितले होते की, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले तर भारत देशाचे वाटोळे होईल. असे म्हणणारे डॉ.मनमोहनसिंघ एकटेच नाहीत. भाजप नेते मुरली मनोहर जोशी, उमा भारती, सुषमा स्वराज यांनी सुध्दा अत्यंत कडक आणि घाणेरड्या शब्दात त्यांना पंतप्रधान पद देवू नका असे विचार व्यक्त केले होते. सुषमा स्वराजला मंत्री पद मिळाले. उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी कोेठे आहेत माहित नाही. पण डॉ.मनमोहनसिंघ यांचा बदला त्यांच्या मृत्यूनंतर घेतला असे बोलले जात आहे.
खरे तर डॉ.मनमोहनसिंघ यांच्या अंतिमक्रियेसाठी जागा देणे हा काही क्षणांचा खेळ होता. कारण भारताच्या नगर विकास विभागाचे मंत्री भाजपचे आहेत. नगर विकास सचिवाला बोलावून जागा एका मिनिटात सुनिश्चित करण्यात आली असती. सरकारकडे जागा नव्हती तर प्रियंका गांधी यांनी आपली आजी आणि वडीलांच्या स्मृतीस्थळांमधील जागा डॉ.मनमोहनसिंघ यांच्या अंतिमक्रियेसाठी देण्याची विनंती केली होती, कॉंगे्रस पक्षाने त्याला पाठींबा दिला होता. तरी पण केंद्र शासनाने हा निर्णय घेतला नाही. अंतिमक्रियेची काही दृश्य पाहिली असता खा.राहुल गांधी, त्यांची आई सोनिया गांधी ह्या अनेकदा रडतांना दिसल्या. गोदी मिडीया राहुल गांधीने माजी पंतप्रधान मनमोहनसिंघ यांचा कसा अपमान केला होता हे दाखविण्यातच धन्यता मानत आहेत. त्यावेळेस राहुल गांधीचे वय आणि त्या वयात असलेली उद्वीग्नता विचारात घेतली तर त्या वयात युवक तसेच करतात. पण आज त्यांना रडतांना पाहुन बहुदा असे म्हणावे लागेल की, आपल्या वडीलांच्या मृत्यूनंतर ते आजच रडले आहेत असो.
भारतीय जनता पार्टी किंबहुना भारत सरकारने दाखवलेली निरागसता आता भारताच नव्हे तर जगात चर्चेला आली आहे आणि या चर्चेमध्ये भारताची छी थु च होत आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा सांगायचे जेंव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंघ बोलतात तेंव्हा जग ऐकते आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भाषण करतांना पंतप्रधानानंतर खासदार असलेल्या डॉ.मनमोहनसिंघ यांना म्हणाले होते की, रेनकोट घालून आंघोळ करणारा भारताचा पंतप्रधान याचा अर्थ असाच होतो ना की, भारत सरकार म्हणेल तेच 100 टक्के खरे आणि इतर सर्व खोटारडे, भारत सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांनीच दुधाने आंघोळ केलेली आहे. म्हणूनच एकदा माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंघ यांनी आपल्या कमी बोलण्यावर एक शेर सांगितला होता की, “हजारो जबाबों से अच्छी मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की, आबरु रखी। ‘ जीवनात बोललेल्या या शब्दांना घेवूनच अंतिम निरोप देतांना सुध्दा माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंघ यांची खामोशीच सुंदर दिसत होती. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंघ यांच्या मृत्यूनंतर अनेक नतदृष्टयांनी त्यांच्या विरुध्द गरळ सुध्दा ओकली होती. परंतू त्यांच्या त्या गरळीने डॉ.मनमोहनसिंघ यांच्या पात्रतेत काही कमतरता येत नाही हे विसरायला नको.