नांदेड(प्रतिनिधी)-एका 30 वर्षीय युवकाला पाच जणांनी मामा चौक बस स्टॅंड उमरीजवळ बोलावून त्याच्या छातीमध्ये आणि पाठीमागून खंजीरचे वार करुन खून केला आहे.
गजानन माधव अडगुडवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 डिसेंबरच्या सायंकाळी 6 ते 8 या वेळेदरम्यान त्यांचाा भाऊ अनिल माधव अडगुडवाड (30) रा.रापतवारनगर उमरी यास नितीन उर्फ एक्का नारायण अडगुडवाड, आशिष बाबुलाल जयस्वाल, विश्र्वनाथ उर्फ इशा शिंदे, साईनाथ स्वामी, नागेश पडोळे यांनी बोलावले. त्यांच्या बोलावण्यावरुन अनिल अडगुडवाड मामा चौक बसस्टॅंड उमरी येथे गेले. त्याठिकाणी अनिल अडगुडवाड त्या सर्वांना काही समजून सांगत असतांना त्या पाच जणांनी लाथाबुक्यांनी मारुन खाली पाडले, छातीत, पाठीमागून, कंबरेवर खंजीरने वार करून त्याचा खून केला. उमरी पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमंाक 433/2024 नुसार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास उमरीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अंकुश माने हे करीत आहेत.
One thought on “उमरी बसस्थानकाजवळ खुन”