ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांची मराठी पत्रकार परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड 

नांदेड :-  मराठी पत्रकार परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस .एम. देशमुख यांनी ही निवड जाहीर केली आहे.

नांदेड जिल्ह्याच्या वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ कणखर , वस्तुनिष्ठ , रोखठोक ,सामान्यांच्या हितासाठी आपली लेखणी झिजविनारे दृष्टे पत्रकार म्हणून प्रकाश कांबळे यांची ओळख आहे. माध्यमात अत्यंत निष्ठेने काम करीत असतानाच मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी विविध जबाबदाऱ्या अत्यंत प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने पार पडल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी आवाज उठवला आहे. पत्रकारितेतील आणि मराठी पत्रकार परिषदेतील त्यांच्या एकूण कार्याबद्दल मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी आज प्रकाश कांबळे यांची मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड केली आहे.

या निवडीबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक , विश्वस्त शरद पाबळे , परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीकर , सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे , कोषाध्यक्ष मंसुरभाई , डिजिटल मीडियाचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे , परिषदेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी , विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे यांच्यासह मराठवाड्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रकाश कांबळे यांचे अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!