एस.एम. देशमुख भाजपच्या संतोष पांडागळेला अध्यक्षपद बहाल करतील काय?

नांदेड (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख हे पत्रकारांच्या भल्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनासोबत द्वंद्व करत असत असतात. राज्य आणि केंद्र शासन भाजपचे आहे. तेव्हा नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता असलेला व्यक्ती एम.एस. देशमुख करतील काय हा प्रश्न सध्या आपले उत्तर शोधत आहे.

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीसाठी वेगवेगळी खलबते सुरू आहेत. यामध्ये मागे अध्यक्ष असलेले माजी अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांना पुन्हा एकदा नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व्हायचे आहे. त्यासोबतच नव्याने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते असलेल्या संतोष पांडागळे यांना सुद्धा नव्याने अध्यक्ष व्हायचे आहे. सुभाष लोणे आणि लक्ष्मण भवरे यांनाही अध्यक्ष पदाच्या शर्यतीत उडी मारायची आहे.

हे सर्व सुरू असताना नांदेड जिल्ह्यात नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सदस्य असलेल्या जवळपास 500 सदस्यांना मात्र या प्रक्रियेपासून दूर लोटत अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी एक निरीक्षक नांदेडला पाठविला. त्या निरीक्षकाने अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्या चार जणांना बोलावून त्यांच्यासोबत चर्चा केली. ज्यात लक्ष्मण भवरे वगळता इतर तिघांनी एस.एम. देशमुख जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, असे लिहून दिले आहे. याचा अर्थ एस.एम. देशमुख नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदावर आपल्या पसंतीचा माणुस अध्यक्षपदावर नेमतील असे दिसते. बऱ्याच संघटनांमध्ये असे घडत असते. पण एस.एम. देशमुख हे पत्रकारांच्या भल्यासाठी कायम राज्य आणि केंद्र सरकारसोबत द्वंद्व करत आले आहेत. अशा परिस्थितीत नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदावर भारतीय जनता पार्टीचे संतोष पांडागळे यांना नेमतील काय हा प्रश्न आपले उत्तर शोधत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!