नांदेड (प्रतिनिधी)- जुगाराची रेड मागून एक जुगार कायद्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर सुद्धा माळटेकडी उड्डाणपूलाखाली वाहनतळ करून जुगार अड्डा जोमात सुरूच आहे. जुगार अड्डे कायम बंद होत नाहीत, हे यावरून दिसले.
वास्तव न्यूज लाईव्हने मागील आठवड्यात माळटेकडी उड्डाणपूलाखाली आपली दुचाकी आणि चारचाकी वाहने तळ करून जुगारी जवळच असलेल्या एका फॉर्महाऊसमध्ये जुगार खेळतात. या आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दोन दिवसांत त्या जुगार अड्ड्यातून एक रेडची मागणी करून पोलीस विभागाने कागदांपुरता गुन्हा दाखल केेला. त्यात चार ते पाच जणांना आरोपी दाखवण्यात आले, पण त्यांच्याकडून रोख रक्कम किती जप्त केेली होती, हे पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोटमध्ये सुद्धा नव्हते.
अशा पद्धतीने रेड मागणी करून तो दाखल करायचा आणि कारभार चालूच ठेवायचा असा काही कारभार सुरू असल्याचे जाणवत आहे. कोण असेल या जुगार अड्ड्याला संरक्षण देणारे, का देत असतील असे संरक्षण याचे उत्तर आम्ही न लिहिता सुद्धा जनतेला माहित आहे.