नांदेड (प्रतिनिधी)-१ जानेवारी ते १५ जानेवारी या वेळे दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीने नमो अॅपवर ऑनलाईन पध्दतीने किंवा ऑफलाईन या पध्दतीने नविन पक्ष सदस्यांची नोंदणी सुरु आहे. नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पन्नास हजार नविन सदस्यांची नोंदणी अपेक्षित आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात साडेचार लाख भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करु असे खा.अशोक चव्हाण यांनी सांगितले.
आज बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत खा.अशोक चव्हाण, आ.जितेश अंतापूरकर, माजी आ.अमर राजूरकर, किशोर देशमुख, चैतन्यबापू देशमुख, मारोती कवळै, विजय गंभिरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले २०२४ मध्ये १५ कोटी नविन सदस्य होणे अपेक्षित होते ज्यांना भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि भारतीय जनता पार्टीची घटना मंजूर आहे, अशा सदस्यांची नोंदणी करायची आहे. भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा सदस्य असलेला राजकीय पक्ष आहे. जे प्राथमिक सदस्य तीन वर्ष पूर्ण करतात त्यांना पुढे कार्यकारी सदस्य होता येते त्यासाठी वेगळी नोंदणी करावी लागते असे सांगितले.
उद्या स्वामीत्व योजनेची सुरुवात होणार आहे. ही योजना महसूल विभागाची आहे. या योजनेव्दारे प्रत्येकाला त्याच्या मालमत्तेचे संपत्ती पत्रक देण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व संपत्ती धारकांना एप्रिल २०२४ पर्यंत हे संपत्ती पत्र मिळतील, असे अशोक चव्हाण म्हणाले.