नांदेड जिल्हा सायबर पोलीस ठाण्याने 18 लाखांचे 125 मोबाईल शोधले

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड पोलिसांच्या सायबर विभागाने एकूण १२५ मोबाईल पकडले आहेत. त्यांची किंमत जवळपास १८ लाख रुपये आहे. ते मालकांना परत देण्यात आले आहेत. तसेच दोन लाख ३९ हजार ६२० रुपये एवढी फसवणूक झालेली रक्कम तक्रारदारांना परत दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक धीरज चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक एम.बी.चव्हाण, पोलीस अंमलदार राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, दावीद पिडगे, महंमद आसिफ, विलास राठोड, काशिनाथ कारखेडे, मोहन स्वामी, दिपक शेवाळे, ज्ञानेश्वर यन्नावार, व्यंकट सांगळे, दिपक राठोड आणि कांचन कसबे यांनी गहाळ झालेले १२५ मोबाईल शोधून काढले. त्यांची किंमत जवळपास १८ लाख रुपये आहे. हे मोबाईल ज्या तक्रारदाराकडून गहाळ झाले आहेत. त्यांना देण्याची तयारी पोलिसांनी ठेवली आहे. त्यातील काही मोबाईल पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या हस्ते मालकांना परत करण्यात आले. सायबर पोलिसांनी सापडलेल्या १२५ मोबाईलचा आयएमईआय क्रमांक नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर, फेसबुक पेजवर आणि व्टिटरवर प्रसारीत केले आहेत. ज्या लोकांचे मोबाईल असतील त्यांनी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या सायबर पोलीस ठाण्यातून आपले मोबाईल परत घ्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहेत.
ऑनलाईन फसवणुकीमुळे नॅशनल सायबर क्राईमच्या (एनसीसीआरपी) आलेल्या तक्रारी तसेच क्रमांक १९३० वर आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विविध बँकांना पत्रव्यवहार व पाठपुरावा करुन फसवणूक झालेली रक्कम होल्ड करुन ठेवण्यास सांगण्यात आली. एकूण सहा तक्रारी एनसीसीआरपीवर आल्या होत्या त्यात एकूण पाच लाख ३२ हजार ८९० रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली होती. त्यातील २ लाख ३९ हजार ६२० रुपये तक्रारदारांना परत देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!