नांदेड (प्रतिनिधी)-२४ डिसेंबर रोजी दुपारी एक ते सायंकाळी सात वाजेदरम्यान सापडलेल्या ४० वर्षीय महिलेचा खुन करणार्या व्यक्तीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
दि.२४ डिसेंबर रोजी सुरेखा वैजनाथ शिंदे (४०) रा.दिग्रस बु. ता.कंधार हिचा मृतदेह सापडला. ज्या ठिकाणी खुन करण्यात आला होता त्याठिकाणी जाण्यासाठी दुचाकी किंवा पायी जाणे असाच पर्याय होता. तरी पण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी आणि अंमलदाराने तेथेच तळ ठोकला आणि कंधार पोलिसांची मदत घेवून हा गुन्हा उघडकीस आणला. यामध्ये पोलिसांनी ज्ञानेश्वर बाबुराव शिंदे (४७) रा.दिग्रस बु.ता.कंधार यास अटक केली. त्याने माझ्या पत्नीला माझ्यासोबत नांदू न देण्यामध्ये सुरेखा शिंदेचा हात होता म्हणून मी तिचा खुन केला असल्याचे आरोपी ज्ञानेश्वर शिंदेने सांगितले.
या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधीक्षक अश्विनी जगताप यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, कंधारचे सहायक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे, सुधाकर खजे, पोलीस उपनिरीक्षक आनंद बिचेवार, मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार रवी बामणे, संजीव जिंकलवाड, विश्वनाथ पवार, चंद्रकांत स्वामी, राहुल लाठकर, बालाजी यादगीरवाड, मारोती मोरे, दादाराव श्रीरामे, राजीव सिटीकर आणि दिपक ओढणे यांचे कौतूक केले आहे.