नांदेड(प्रतिनिधी)-लोहारगल्ली परिसरातील एका प्लॉस्टीक आणि इमिटेशन ज्वेलरी दुकानाला आग लागून 70 ते 75 लाखांचे नुकसान झाले आहे. जवळपास 12 अग्नीशमन वाहनानी ही आग आटोक्यात आणली. यात जिवीत हाणी मात्र झालेली नाही.
आज 25 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजेच्यासुमारास लोहारगल्ली परिसरात असलेल्या लक्ष्मी प्लॉस्टीक सेंटर ऍन्ड इमिटेशन ज्वेलरी या दुकानाला आग लागली. हे दुकान 20 फुट रुंद आणि 80 फुट लांब असे जमीनीखाली अंडरग्राऊंडमध्ये आहे. त्यामुळे आग लागल्यानंतर धुराचा लोंढा तयार झाला तो अग्नीशमन जवानांना मध्ये जाण्यास रोखत होता. त्या इमारतीच्या पाठीमागे असलेली भिंत जे.सी.बी.ने पाढून तेथून पाण्याचा मारा करण्यात आला. समोर आणि पाठमागून एकाच वेळी तीन गाड्या पाणी टाकत होत्या. एकूण 12 फायर टेंडर यांनी आगीवर नियंत्रण आणले.
लक्ष्मी प्लॉस्टीक दुकानाचे मालक गजेंद्र वसंतराव बोबडे यांनी सांगितले की, दुकानात 70 ते 75 लाख रुपयांचे साहित्य होते. ते जळून नुकसान झाले आहे. याच इमारतीत पहिल्या मजल्यावर लग्नाची रुखवत खरेदी करण्याचे दुकान होते. त्या दुकानात असलेले 3 ते 4 लाख रुपयांचे सामान वाचविण्यात आले. या इमारतीत दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर इमारतीचे मालक राम वसमतकर यांचे निवासस्थान आहे. त्या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मुख्य अग्नीशमन अधिकारी के.एल. दासरे यांच्या मार्गदर्शनात उपअग्नीशमन अधिकारी निलेश कांबळे, मोहम्मद साजिद, पवळे, शिंदे, ताटे, किरकन, तोटावार आणि खेडकर यांची मेहनत फळाला आली.