नांदेड- नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयामधील ( आरटीओ ) शिकाऊ व पक्क्या लायसन्ससाठी ( अनुज्ञप्ती ) 25 तारखेला नियमित देण्यात आलेल्या चाचण्यांची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार 25 डिसेंबरला ख्रिसमस सणानिमित्त सुट्टी असून या दिवशी कार्यालय बंद राहणार आहे. त्यामुळे या दिवशी ज्यांना लायसन्स संदर्भात ऑनलाईन सूचना आली आहेत. त्यांची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची माहिती ऑनलाईन सारथी प्रणालीवर तपासून पुढील तारखेवर चाचणीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.