नांदेड :- राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन राजस्थान राज्यात जयपूर येथे 7 ते 13 जानेवारी 2025 पर्यंत केले आहे. या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांसाठी खुल्या गटाची राज्य निवड चाचणी घेतली जाणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड करण्याचे प्रयोजन आहे. या निवड चाचणीसाठी क्रीडापटूंनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
इंडियन असोसिएशनद्वारा ऑलिम्पिक अॅडहॉक समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. अॅडहॉक समिती व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. महिला व पुरुष गटासाठी पुणे येथील आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे 26 डिसेंबर रोजी सकाळी 8 वा. चाचणी घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी पुणे येथील जिल्हा क्रीडा अधिकारी श्री कसगावडे मो.नं. 9422518422 यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड कार्यालयाने केले आहे.