नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाड्यातील रुग्णांना दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने मराठवाड्यातील नांदेड येथे एम्ससारखी संस्था स्थापन करून मराठवाड्यासह शेजारच्या राज्यातील रुग्णांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यासाठी एम्सची स्थापना अत्यंत गरजेची आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्याकडे आपण मागणी केली असल्याचे मत खा.डॉ.अजित गोपछडे यांनी व्यक्त केली.
मराठवाडा हा मागास भाग म्हणून ओळखला जातो. याा भागात आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात या भागासह शेजारच्या विदर्भ भागासह तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातील रुग्णांना उपचार घेण्यासाठी नांदेड हे मध्यवती केंद्र ठरणार आहे. सध्या या ठिकाणी एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय, दंत महाविद्यालय, खाजगी आयुर्वेदीक महाविद्यालय याच बरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाजगी रुग्णालय आहेत. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण या रुग्णांवर दर्जेदार उपचार होत नसल्याने या ठिकाणी आलेल्या रुग्णांना मुंबई, पुणे, हैद्राबाद, नागपूर आदी ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे. मराठवाड्यातील 8 जिल्हे यात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, धाराशिव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह शेजारच्या तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी नंादेड येथे येत असतात. विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला आदी जिल्ह्यातून देखील रुग्ण येतात. या रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नांदेड येथे एम्ससारख अध्यावत रुग्णालय स्थापन व्हाव अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा, ना.अनुप्रिया पटेल, ना.प्रताप जाधव या तिन्ही केंद्रीय मंत्र्यांकडे आपण मागणी केली आहे आणि यासाठी पाठपुरावा करून एम्ससारख अद्यावत संस्था नांदेड येथे स्थापन व्हावी यातून अनेक रुग्णांना चांगल्या आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील असा आशावादही खा.अजित गोपछडे यांनी व्यक्त केला.