जर मी संविधान, तिरंगा हातात घेवून दिल्लीच्या रस्त्यावर उतरलो तर तुमच्या सरकारला संपवून टाकेल, ती सरकार मातीत पुरून टाकेल अशा कडक शब्दात पुर्वांचल गांधी संपूर्णानंद यांनी अमित शाहला इशारा दिला आहे. तुम्हीच देव-देव करा आणि आपल्या सात जन्मांचे आरक्षण स्वर्गामध्ये करा अशी सुचना दिली आहे. डॉ.बी.आर.आंबेडकर हे माझे, 140 कोटी जनतेचे, संविधानाला मानणाऱ्यांचे देवच आहेत. मी 1 लाख वेळेस आंबेडकर..आंबेडकर म्हणले. कोणाची हिंम्मत असेल तर मला रोखून दाखवा. मी असे केले तर भारतीय जनता पार्टीला माझी हत्या केल्याशिवाय दुसऱ्या पर्याय शिल्लक राहणार नाही असे संपूर्णानंद म्हणाले.
भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांमधील रामप्रसाद बिस्मील, आशफाख उल्ला, रोशन आणि राजेंद्र लाहिडी या चौघांना 19 डिसेंबर 1927 रोजी वेगवेगळ्या जेलमध्ये फासावर चढविण्यात आले होते. त्यांच्या स्मृतीदिनी पुर्वांचल गांधी संपुर्णानंद यांनी भारत सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जगातल्या पश्चिम भागात गेलात तर तुम्ही काय सांगणार. आम्ही आरएसएसच्या देशातून आलोत, आम्ही हिंदु-मुस्लिम भांडण लावणाऱ्या देशातून आलोत आणि असे सांगितले तर तुमची किंमत किती राहिल. तुम्हाला गांधी, भगतसिंघ, आंबेडकर आणि कलाम यांच्या देशातून आलो म्हणाल्यावरच तुम्हाला सन्मान मिळेल. गांधी, भगतसिंघ, आंबेडकर आणि कलाम हे माझे देव आहेत. मी कधीच मंदिरात जात नाही, मी मुर्ती पुजा करत नाही. कालच मी युएईमधून आलो आहे. त्यांची प्रगती पाहा. मला एकही माणुस तेथे गरीब दिसला नाही. मी योगी गोरखनाथांचा भक्त आहे. मी फक्त त्यांच्यासमोर आपले मस्तक झुकवत असतो.
अमित शाहने ज्या पध्दतीने आंबेडकरांचे नाव घेतले. ते हा विवाद नसून तो द्वेष आहे. देशातच्या 142 कोटी लोकांना शिवी आहे. अमित शाहने विचार करावा की, संविधान नसते तर कसे झाले असते. आंबेडकरांचे प्रपौत्र बाळासाहेब आंबेडकर म्हणाले भारतीय जनता पार्टीची ही वृत्ती पुर्वीपासूनच आहे. त्यांना संविधान बदलायचेच आहे. लोकसभा, राज्यसभेत बोललेल्या शब्दांमध्ये ओघात काही चुक घडते सुध्दा पण ती दुरूस्त करण्यासाठी 48 तासांचा वेळ पण आहे. अमित शाहने या 48 तासांमध्ये काही बदल केलेला नाही. म्हणजेच ते आपल्या बोलण्यावर ठाम आहेत. तेंव्हा आता फक्त माफी मागून चालणार नाही. तर त्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना बरखास्त करण्यात यावे असे ऍड.बाळासाहेब आंबेडकर सांगतात.
पुर्वांचल गांधी म्हणतात संविधान आणि तिरंगा हाता घेवून मी जर दिल्लीच्या रस्त्यावर आलो तर तुमची सरकार 24 तासात पुरून टाकेल. कारण आंबेडकर, संविधान यांच्यासाठी जीव देणारी मंडळी आज ही जिवंत आहे. आंबेडकर हे एक व्यक्ती नसून समता, एकता पुरूष आहेत. त्यांच्यामुळेच अनेकांना बरोबरीचे स्थान मिळाले. तुम्ही नेहरु बदल वाईट बोलता पण त्यांचा अभिलेख लिहिलेला आहे. तो अभिलेख तुम्हाला बदलता येणार नाही. अमित शाहने पत्रकार परिषद घेवून बोलले खरे पण त्या बोलण्यात सुध्दा गर्व होता. माफी मागून साध्या सोप्या पध्दतीने डॉ.बी.आर.आंबेडकरांचे नाव घेवून झालेली चुक दुरूस्त करता आली असती. पण अमित शाहला ती करायचीच नव्हती. दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन लवकर समाप्त करण्यात आले. हे सुध्दा देशाचे नुकसान आहे.
विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील भारतीय न्याय संहितेचे कलम 109 मागे घेण्यात आले आहे. पण तरीही त्यांच्याविरुध्द अनेक कलमानुसार गुन्हा प्र्रलंबित आहे. प्रेमाचा धर्म या विषयावर व्याख्यान देवून परत आलेले पुर्वांचल गांधी भारतात सुरू असलेल्या घटनाक्रमावर अत्यंत दु:खी आहेत आणि या दु:खाचा उद्रेक करतांना अत्यंत कडक शब्दात सरकारला सुनावले आहे की, मी हातात संविधान आणि तिरंगा घेवून जर दिल्लीच्या रस्त्यावर उतरलो तर 24 तासात तुमचे सरकार जमीनीखाली पुरून टाकेल.
सोर्स:भारत एक नई सोच, ऍड.बाळासाहेब आंबेडकर, पुर्वांचल गांधी, दिपक शर्मा.