आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर आणि आंबेडकर या आपल्या विरुध्द तयार झालेल्या नॅरेटिव्हला बदलण्यासाठी भारतीय जनता पार्टीने राहुल गांधी विरुध्द जीवघेणा हल्लाचा गुन्हा दाखल करून घेतला आणि काही नाटकी खासदारांच्या मदतीने त्या नॅरेटिव्हला नवीन नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भाने आता जनता सुध्दा रस्त्यावर अमित शाहना शिव्या श्राप देत आहे. त्या नॅरेटिव्हला कसे बदलण्यात येईल याचा काही मार्ग भारतीय जनता पार्टीकडे सध्या तरी नाही. खोट्या आधारावर आपण कोणतेही यश मिळवू शकत नाही. बहुदा हे भारतीय जनता पार्टीला कळत नाही.
विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांनी जीवघेणा हल्ला केला यासाठी खासदार मुकेश राजपुत, खासदार प्रताप सारंगी हे दोन खासदार सध्या आयसीयुमध्ये भरती आहेत. डॉक्टारांनी सांगितलेल्या अहवालाप्रमाणे त्यांचे एमआरआय, सिटी स्कॅन या चौकशीमध्ये काहीही चुकीचे आलेले नाही. त्यांचा बी.पी. सर्वसाधारण आहे, हृदय पुर्णपणे काम करत आहे. खासदार सारंगीच्या डोक्यावर अगोदर छोटी पट्टी होती, नंतर ती मोठी झाली आणि त्यानंतर तर त्यांची संपुर्ण खोपडीच पट्टीत बांधल्या गेली. अशा पध्दतीने त्यांच्या जखमेचे स्वरुप वाढवून दाखविण्यात आले. परंतू त्यांना आयसीयुमधून सोडण्याचा निर्णय वरिष्ठ नेते मंडळी घेतली असे डॉक्टर सांगत आहेत असे आहे तर नक्कीच या प्रकरणात मोठा घोळ आहे. कारण आयसीयुमधून सोडण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार डॉक्टारांचा असतो. परंतू डॉक्टरच सांगत आहे की, या दोन खासदारांना आयसीयुमधून सोडण्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. काय चालले आहे या लोकशाहीमध्ये पाहा. सोबतच नागालॅंडमधील एक महिला खासदार सांगत आहेत की, राहुल गांधींनी माझा विनयभंग केला. राहुल गांधीसोबत 6 पीएसओ असतात. विनयभंग करायचाच असेल तर त्यांच्यासमोर राहुल गांधी करतील काय? यासाठी त्या महिलेने बऱ्याच महिला खासदारांच्या स्वाक्षऱ्या घेवून एक अर्ज दिला. त्या अर्जावर मी पाहिले नसतांना स्वाक्षरी केले असल्याचे खा.हेमा मालिनी यांनी सांगितले आहे. पण जीवघेणा हल्ला केला म्हणून सध्या दिल्ली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि खा.राहुल गांधी यांना चौकशीसाठी सुध्दा बोलावले आहे. या उलट काही वकीलांच्या टिमने विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाबद्दल सुध्दा अमित शाह विरुध्द दिल्ली पोलीस ठाण्यात अर्ज दिला आहे. पण त्यात काय झाले हे अद्याप कळले नाही. दिल्ली पोलीस अर्थात केंद्र शासनाची पोलीस म्हणजेच अमित शाह यांची पोलीस. याचा अर्थ असा लावला जात आहे की, राहुल गांधीला अटक होणार आणि त्यांना तुरूंगात पाठविले जाणार. ज्या दिवशी खा.प्रताप सारंगी आणि खा.मुकेश राजपूत दिल्लीच्या आयसीयुमध्ये उपचारासाठी दाखल झाले. त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते ज्यांनी राम मंदिर हा विषय भारतीयसाठी उपलब्ध करून दिला ते सुध्दा आयसीयुमध्ये भरती झाले. पुर्वी अनेक मंत्र्यांना भेटण्यासाठी खा.सारंगी आणि खा.राजपूतचा नंबर लागत नव्हता त्यांना भेटायला केंद्रीय मंत्र्यांची रांग लागली. पण लालकृष्ण अडवाणी यांना भेटायला कोणी नेते, मंत्री, छोटे नेते गेले नाहीत. यालाच म्हणतात भारतीय जनता पार्टी.
जखमी खासदारांपैकी खा.मुकेश राजपूत सांगतात राहुल गांधी पुढे होते माझ्या मागून धक्क्याचा लोंढा आला आणि मी खा.प्रताप सारंगी यांच्यावर पडलो आणि ते खाली पडले. आयसीयुमध्ये असलेले खा.प्रताप सारंगी हरकुलस स्वरुपाचा त्यांचा शारिरीक बांधा आहे आणि त्यांना राहुल गांधींनी ढकलून दिल्यामुळे त्यांचा जीव जाण्याची शक्यता होती असा गुन्हा दाखल झाला आहे. यासाठी खा.प्रताप सारंगी यांचा ईतिहास तपासणे सुध्दा आवश्यक आहे. 1965 मध्ये भारतात कुष्ठरोग्यांचे प्रमाण जास्त होते. भारतातील डॉक्टर सुध्दा कुष्ठरोग्यांना हात लावून तपासणी करण्यासाठी धजावत नव्हते. त्या काळात न्युझिलॅंडमधून ग्राहमस्टेल, त्यांच्या पत्नी आणि त्यांची दोन मुले भारतात आली. ओरीसात राहिली. त्यांनी कुष्ठरोग्यांची एवढी सेवा केली की, 1999 पर्यंत ओरीसातील जनता त्यांना देव मानायला लागली. एवढी प्रसिध्दी त्यांना प्राप्त झाली. या प्रसध्दीला संपविण्यासाठी आताचे खा.प्रताप सारंगी हे त्यावेळेस ओरीसामधील बजरंग दलाचे 1999 मध्ये अध्यक्ष होते. त्यांच्या गॅंगने एक अघटीत प्रकार केला. एका सांस्कृतिक महोत्सवाचा कार्यक्रम सुरू असतांना त्या गॅंगचा म्होरक्या दारासिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्राहमस्टेल आणि त्यांच्या 11 आणि 6 वर्षांच्या बालकांसह एक चारचाकी गाडीला पेटवून दिले. आपल्या दोन्ही बालकांना आपल्या कवेत लपवून ग्राहमस्टेल त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत होते. अशाच अवस्थेत तिघांची प्रेते सापडली होती. त्या गुन्ह्यात प्रताप सारंगी आरोपी होते. दुर्देवाने त्यांना शिक्षा झाली नाही. त्या प्रकरणात फक्त दारासिंगला शिक्षा झाली. त्यावेळेस ग्राहमस्टेलच्या पत्नीने सांगितले होते की, त्याला सोडून टाका. त्यानंतर सुध्दा ग्राहमस्टेलच्या पत्नी सन 2006 पर्यंत भारतात राहिल्या आणि आपल्या पतीचे अपुर्ण राहिलेले काम पुर्ण करून परत न्युझिलॅंडला परत गेल्या. असे आहेत हे महाप्रतापी खासदार प्रताप सारंगी.
भारताच्या लोकसभेत, राज्यसभेत प्रत्येक कोनाड्यात सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे. त्याचे फुटेज उघड करून भारतीय जनता पार्टी त्यांच्याविरुध्द होत असलेल्या आरोपांबद्दल का उत्तर देत नाही असा प्रश्न आपण स्वत:लाच विचारला तर याचे उत्तर असे मिळते की, खरे सत्य बाहेर येईल, कोणी-कोणाला धक्का दिला हे सत्य बाहेर येईल. संसदेचे सीसीटीव्ही फुटेज त्यावेळेस बंद केले गेले असतील तर भारताच्या संसदेची सुरक्षा पुन्हा एकदा चर्चेत येईल अशी आहे भारतीय जनता पार्टीची खरी प्रवृत्ती. संसदेत यंदाच कॉंगे्रसने निर्दशने केली असे नाही. यापुर्वी सुध्दा केलेली आहेत. भारतीय जनता पार्टीची सरकार येण्यापुर्वी सुध्दा भारतीय जनता पार्टीने अशी निदर्शने केली. परंतू त्यावेळी सत्ताधारी पक्षांनी विरोधकांना आडविण्याचा प्रयत्न कधी केला नाही. यंदा सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी विरोधकांना लोकसभेत जाण्यासाठी अडवून हा नवीन प्रकार केला आहे. फक्त राजकीय पक्षच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल उच्चालेल्या शब्दांचा विरोध करत नाही. गल्ली बोळामध्ये सुध्दा त्याचा विरोध होत आहे. जनता रस्त्यावर अमित शाह यांना शिव्या-श्राप देत आहेत. त्या शिव्या लिहुन आम्ही आमची किंमत कमी करून घेवू इच्छीत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि इतर कुटूंबिय सुध्दा आता आमची ताकत बाबासाहेब असे म्हणून रस्त्यावर उतरली आहेत. अमित शाहने या संदर्भाच्या घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सुध्दा त्यांच्या बोलण्याचा रंग-ढंग हा गर्वाचाच होता. तो काही जनतेला समजत नाही असे नाही. जनता याचे उत्तर नक्कीच देईल.