नांदेड(प्रतिनिधी)-नंादेड जिल्हा कारागृहात एका महिलेला आणि एका पुरूष पोलीसाला दोन वेगळ्या कारागृहात तात्पुर्त्या स्वरुपात सलग्न करण्यात आले आहे. नांदेड जिल्हा कारागृहाचे अधिक्षक पी.एच.खरात यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
नांदेड जिल्हा कारागृहात काही दिवसापुर्वी एक-दुसऱ्या विरुध्द गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया झाली. त्यानंतर नांदेड जिल्हा कारागृह अधिक्षक बी.एच.खरात यांनी नांदेड कारागृहाच्या आस्थापनेवरील महिला पोलीस कविता किशन धोतरे यांना छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात पााठविले आहे. तसेच पुरूष पोलीस देवानंद उत्तम काकडे यांना लातूर जिल्हा कारागृह येथे पाठविले आहे. हे आदेश उपमुख्यालयाच्या आदेशानुसार जारी करण्यात आले आहेत. पुढील आदेश होईपर्यंत उपमुख्यालयाने त्या दोघांना दुसरीकडे सलग्न करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही झाली आहे.