नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी अवैध पणे चोरीची वाळु वाहतुक करणाऱ्या एका हायवा गाडीला पकडून ती गाडी चालविणाऱ्या चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सोनखेड येथील पोलीस अंमलदार ए.एच.कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 डिसेंबर रोजी मध्यरात्रीनंतर 12.30 वाजेच्यासुमारास ते आपल्या सहकाऱ्यांसह गस्त करत असतांना शिवाजीनगर चौक पेनूर येथे पोहचले. तेथे त्यांनी हायवा गाडी क्रमंाक एम.एच.12 एच.डी.7882 हीची तपासणी केली. या हायवा गाडीत चोरीची आणि बेकायदेशीर वाळू भरलेली होती. सोनखेड पोलीसांनी 20 लाखांची हायवा गाडी आणि 25 हजार चोरीची वाळु असा 20 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक जी.एन.गिते, पोलीस अंमलदार ए.एच. कदम, डब्ल्यु.एम. नागरगोजे आणि एस.के.वाघमारे यांचे या कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे.
हायवा गाड्या पकडल्या जातात तेंव्हा महत्वाची बाब अशी आहे की, बहुतेक गाड्या एम.एच.12 क्रमांकाच्या असतात. हा क्रमांक पुणे जिल्ह्याचा आहे. तसेच या गाड्या हस्तांतरीत केलेल्या नसतात. या गाड्यांचा विमा संपलेला असतो. या गाड्यांचे क्षमता प्रमाणपत्र संपलेले असते असे बहुतेक वेळा सापडते. पण त्याबद्दल काही कार्यवाही होत नाही. हा याती एक दुर्देवी प्रसंग आहे.