नांदेड(प्रतिनिधी)-तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर यांच्या कार्यालयात आरोग्य सेवक असलेल्या एका व्यक्तीचे तीन महिन्याचे पगार बिल काढल्या प्रकरणी 4 हजार 500 रुपयांच्या लाचेची मागणी करून 3 हजार रुपये स्विकारले. पण उर्वरीत दीड हजार घेतांना तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात कंत्राटी लेखापाल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
4 डिसेंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आरोग्य सेवक असलेल्या एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचे पगार बिल काढण्यासाठी आरोग्य अधिकारी कार्यालयातील कंत्राटी लेखापाल आशिष गंगाधर मोगले यांनी 4 हजार 500 रुपयांची लाच मागणी केली. त्यानुसार तक्रारदाराने 3 हजार रुपये दिले. त्याचे तीन महिन्याचे वेतन बिल निघाले. त्यानंतर कंत्राटी लेखापाल आशिष मोगले उर्वरीत दीड हजारांची मागणी वारंवार करत होते. त्यामुळे त्रासलेल्या तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गाठले आणि तक्रार दिली. या लाच मागणीची पडताळणी सुध्दा 4 डिसेंबर रोजी झाली. त्यात सुध्दा आशिष मोगलेने दीड हजार रुपये लाचेची मागणी केली. आज 19 डिसेंबर रोजी मात्र दीड हजारांची लाच स्विकारतांना कंत्राटी लेखापाल आशिष मोगले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. वृत्तलिहिपर्यंत भोकर पोलीस ठाण्यात आशिष गंगाधर मोगले विरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.संजय तुंगार, पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक माधुरी यावलीकर यांनी आपले पोलीस अंमलदार गजेंद्र मांजरमकर, शेख रसुल, रापतवार, रमेश नाामपल्ले यांच्यासह ही कार्यवाही पुर्ण केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन केले आहे की, नागरीकांकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीन अधिकारी, कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फि व्यक्तीतिरक्त अन्य लाचेची मागणी केली तर दुरध्वनी क्रमांक 02462-253512 आणि टोल फ्रि क्रमांक 1064 वर संपर्क साधून लाचेची माहिती द्यावी.