नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील भारतीय संविधानाच्या प्रतिकृती विटंबनेबाबत भारतीय बौध्द महासभेच्यावतीने आज राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.
10 डिसेंबर रोजी परभणी येथे झाललेल्या दुर्देवी घटनेबाबत भारतीय बौध्द महासभेने निषेध व्यक्त केला आहे असे कृत्य करणाऱ्यांवर देशद्रोहासारख्या कलमान्वये कार्यवाही व्हावी. या घटनेची सीबीआय चौकशी करून याचा मास्टरमाईंड कोण आहे हे शोधून काढावे. तसेच सोमनाथ सुर्यवंशी या आंबेडकरवादी युवकाचा मृत्यू झाला. त्याच्यावर अमानवी अत्याचार करणाऱ्या पोलीसांवर कार्यवाही व्हावी. द्वेषभावनेतून अशी अमानुश मारहाण झालेली आहे. परभणी पोलीसांनी सुरू केलेले कोबींग ऑपरेशन बंद करावे. परभणी येथील युवकांवर आणि महिलांवर दाखल केलेले गुन्हे परत घ्यावेत. नसता जिल्ह्यातील बौध्द सामाज रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करेल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर भारतीय बौध्द महासभेच्या नांदेड जिल्हा उत्तरचे सरचिटणीस रविकिरण जोंधळे, कोषाध्यक्ष सा.ना.भालेराव, मेजर सुरेश गजभारे, डीव्हीजन ऑफीसर कृष्णा गजभारे आणि मेजर समता सैनिक दलचे आनंद झडते यांच्यासह समता सैनिक दलाच्या अनेक महिला उपस्थित होत्या.
या निवेदनाच्या प्रति बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भिमराव आंबेडकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.के.भंडारे, राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी भिकाजी कांबळे आणि राज्य अध्यक्ष यु.जी.बोराडे यांना पण पाठविण्यात आल्या आहेत.