नांदेड(प्रतिनिधी)-परभणी घटनेतील पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांचा ईतिहास हा गुन्हेगारी स्वरुपाचा आहे. त्यांनी या अगोदर सुध्दा दोन जणांना समोर बसवून गोळी मारलेली आहे आणि त्याला एंनकाऊंटर दाखवलेेले आहे. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारांना सांगितले.
आज पत्रकारांशी बोलतांना ऍड.बाळासाहेब आंबेेडकर यांनी परभणीच्या घटनेतील स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक अशोक घोरबांडबद्दल सांगितले की, यानेच लाठीचार्ज घडविलेला आहे असे मला परभणीच्या लोकांनी सांगितलेले आहे. या प्रसंगी पुढे बोलतांना ऍड.आंबेडकर म्हणाले परभणीची घटना अत्यंत दुर्देवी आहे. ती घटना घडविणाऱ्या पवारला माथेफिरू घोषित केले गेले. खरे तर असे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरची सर्वात अगोदर चौकशी व्हायला हवी. परभणीतील बंद शांतते पार पडला, आंदोलन समाप्त झाले. त्यावेळी मागून कोणी तरी दगडफेक केली आणि परिस्थिती बेकाबु झाली. त्यानंतर 4 तासात पोलीसांनी कोंबींग ऑपरेशन सुरू केले. त्यावेळी पोलीसांशिवाय खाजगी माणसाने सुध्दा लाठीचार्ज केला. पोलीसांनी स्वत: गाड्या फोडल्या याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एका जागी शांत बसून काही तरी लिहित असलेल्या विधी शाखेचे विद्यार्थी शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांना पकडले आणि चार दिवस त्याला मारहाण केली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. औरंगाबाद येथे सुसज्ज अशा दवाखान्यात त्यांचे शवविच्छेदन व्हावे अशी मागणी आमचीच होती आणि तसे झाले आहे. तेथे समोर आलेल्या अहवालाप्रमाणे त्याच्या शरिरावर बाहेरील मार आणि आतील मार यामुळेच त्याचा मृत्यू झाला आहे हे स्पष्ट झाले. यावरुन असे दिसते की, परिस्थिती सरकारला सांभाळता आलेली नाही. पोलीस उपमहानिरिक्षक आणि पोलीस अधिक्षक यांना कोंबींग ऑपरेशनचे आदेश दिले होते काय असा प्रश्न विचारला तेंव्हा त्यांनी मौन पाळलेले आहे. म्हणजेच मी मागे म्हणालो तसे अन गाईडेड ज्या मिसाईल्स पोलीसांच्या आहेत. त्यांनीच हा लाठी चार्ज घडविलेला आहे. सव्वा महिन्याचे बाळ असलेल्या महिलेला सुध्दा पोलीसांनी मारहाण केलेली आहे.
परभणीच्या सर्व घटनांचे संकेत सांगायचे असतील तर सन 2004 मध्ये घडलेले गोधरा कांड पुन्हा एकदा घडवायचे आहे असा मानस दिसतो. आपल्या लोकांनी आता सावध राहावे कारण गोधरा कांड सारखे कांड व्हावे यासाठी भडकावणारे बरेच येतील. हे गोधरा कांड अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि मुस्लीम या कोणासोबतही घडू शकते असे मला वाटते. शहीद झालेल्या सोमनाथ सुर्यवंशीच्या कुटूंबियांना एक कोटी नुकसान भरपाई आणि त्यांच्या कुटूंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी. तसेच लाठीचार्जमध्ये अनेक जणांचे हात, पाय, फॅक्चर झाले आहेत. त्यांना 25 लाखांची नुकसान भरपाई द्यावी. ही नुकसान भरपाई पोलीसांकडून वसुल करुन द्यावी अशी माझी मागणी आहे. परभणीची घटना घडल्यानंतर आंबेडकरी समाजाच्या मतांसाठी त्यांच्याकडे येणारे कोणतेही नेते तेथे आले नाहीत.
पत्रकारांनी विचारलेल्या अमित शाह यांच्या वक्तव्यावर बोलतांना ऍड.बाळासाहेब आंबेडकर म्हणाले त्यांच्या बोलण्याचा अर्थ एवढाच होतो की, जनतेने देवाला मानावे डॉ.बी.आर.आंबेडकरांना मानु नये ही मनुवादी प्रवृत्ती आहे.
ऍड.बाळासाहेब आंबेडकर हे पत्रकारांशी बोलत असतांना वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुकवर प्रसारीत झालेली त्या पत्रकार परिषदेची लिंक जोडलेली आहे.
https://www.facebook.com/share/v/FBTuFuYXusrRgczA/