इस्लापूर- किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या सावरगाव परिसरात दिनांक 15 रोजी सायंकाळी च्या मध्यरात्री एका 45 वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली. असून सदरील घटनेचा शोध इस्लापूर पोलीस घेत आहेत. सावरगाव येथील ऑटो चालक सखाराम मारोती गायकवाड राहणार सावरगाव वय 45 वर्ष या तरुणांचा दिनांक 15 रोजी च्या मध्यरात्री सावरगाव येथील धाब्यावर काही मध्य धुंद अवस्थेत असलेल्या तरुणांशी भांडणाच्या स्वरूपातून वाद निर्माण झाला होता त्यातूनही या तरुणास दगडाने ठेचून मारून टाकण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सदरील हत्या कशामुळे झाली याचा शोध लागणे हा उत्सुकतेचा विषय बनला आहे.
इस्लापूर परिसरात गेल्या वर्षभरामध्ये डोंगरगाव ,दयाळ धानोरा, या गावांमधून गांजा तस्करी त्याचबरोबर परिसरात शिवनी इस्लापूर जलधरा या ठिकाणाहून होणारी गुटखा तस्करी सारख्या मोठ्या घटना घडल्यात त्यातच नांदेड पोलिसांनी सुद्धा डोंगरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा ची कार्यवाही केली. त्या कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यातच दयाळ धानोरा या ठिकाणी सुद्धा तेलंगणा व महाराष्ट्राच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. किनवट तालुक्यामध्ये सदरील होणाऱ्या कार्यवाहीमुळे अवैध धंदेवाल्यांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले हे आता सिद्ध झाले असून कोण्या ज्योतिषाला सांगण्याची गरज नाही ? यातूनच तर या घटना घडत नाहीत का ? अशी चर्चा आता परिसरात सुज्ञ नागरिकाकडून ऐकावयास मिळत आहे. सदरीत घटनेत हत्या पावलेल्या सखाराम मारोती गायकवाड यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेणे आता एक प्रकारे पोलिसांना आव्हान बनले आहे. सदरील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन किनवट येथील उपविभागीय अधिकारी रामकृष्ण मळधणे यांनी घटनास्थळी भेट दिली. असतात तात्काळ या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यावी अश्या स्वरूपाची मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली. त्याचबरोबर श्वान पथक, फिंगरप्रिंट, फॉरेन्सिक टीम यांना सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक टीमचे प्रमुख उद्धव पवार श्वानपथक टिमचे देवगुंडे बिचेवार व रुंजे यांनी घटनास्थळी भेट दिली. सदरील हत्या झालेल्या घटनास्थळाच्या ठिकाणी पोलिसांनी मयतांचा मोबाईल कागदपत्रे व इत्यादी वस्तू जप्त केल्या. नांदेड जिल्ह्याचे पोलीस महानिरीक्षक गुन्हेगाराचे कर्दनकाळ शहाजी उमाप यांनी या प्रकरणाकडे लक्षवेधावे अश्या स्वरूपाची मागणी या निमित्ताने पुढे येत आहे. सदरील मयताचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला असून वृत्त लिहीपर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा पोलिसात नोंद झाला नव्हता सदरील घटनेचा तपास येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले हे करीत आहेत.