रिपब्लिकन सेनेचे नांदेड बंद शांततेत

नांदेड(प्रतिनिधी)-रिपब्लिकन सेनेचे पुकारलेला नांदेड बंद 100 टक्के यशस्वी झाला आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वात असंख्य पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी या बंदमध्ये काही अप्रिय घटना घडू नये यासाठी दिवसभर मेहनत घेतली आहे.
रिपब्लिकन सेनेचे राज्य सचिव माधवदादा जमदाडे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष प्रा.राजू सोनसळे, अनिल शिरसे यांच्यास अनेक सदस्यांनी, आंबेडकरवादी विचारांच्या लोकांनी सकाळी महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर जमले. तेथे परभणी घटनेबद्दल अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घेवून जाण्याऐवजी रिपब्लिकन सेनेने निर्णय घेतला की, पोलीस ठाणे शिवाजीनगरमध्येच जाऊ आणि तेथेच आपले निवेदन देवू. त्याप्रमाणे रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते, आंबेडकरी विचारसरणीचे अनेक व्यक्ती पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे पोहचले. पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे यांनी त्यांचे निवेदन स्विकारले आणि रिपब्लिकन सेनेेने आपले आंदोलन समाप्त केले. अत्यंत कमी वेळेत आणि कोणतीही लोकशाहीला अभिप्रेत नसलेली कृती न करता या आंदोलनाची सांगता झाली.
सकाळपासूनच नांदेड शहर पुर्णपणे बंद होते. जागो-जागी, चौका-चौकात पोलीसांनी ठाण मांडले होते. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, यांच्यासह शहरातील सर्व पोलीस निरिक्षक यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी कोणताही कायद्या व सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण होणार नाही यासाठी दिवसभर मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!