नांदेड(प्रतिनिधी)-दहा डिसेंबर रोजी परभणीत घडलेल्या घटनेनंतर त्याच दिवशी अटक आणि पुढे न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका युवकाचा मृत्यू झाला आहे. याबद्दल वेगवेगळे तर्क वितर्क सांगितले जात आहेत.
10 डिसेंबर रोजी परभणी शहरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यंाच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर उद्रेक झाला. त्या विटंबनेची प्रतिक्रिया देतांना परभणी शहरातील शंकरनगर येथे राहणारे युवक सोमनाथ व्यंकटी सुर्यवंशी (35) यांना पण अटक झाली. नवा मोंढा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना न्यायालयीन कोठडी अर्थात तुरूंगात पाठविल्यानंतर काल रात्री त्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूबद्दल वेगवेळे दावे होत आहेत. परंतू शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
सोमनाथ सूर्यवंशी च्या मृत्यूची माहिती आल्याबरोबर नांदेड मध्ये सुद्धा दुकाने बंद होत आहेत. याबद्दल मागोवा घेतला असता सोमनाथ सूर्यवंशीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदेडला येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बहुदा त्यामुळेच पटापट दुकाने बंद झाली आहेत.