नांदेड(प्रतिनिधी)-गणेशनगर धर्माबाद येथे एक घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 80 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. लक्ष्मण मोहनराव रामपुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 13 डिसेंबरच्या सकाळी 10 ते 11 वाजेदरम्यान ते आणि त्यांची पत्नी घराला कुलूप लावून आपल्या शेतात गेले होते. परत आले तेंव्हा त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले होते आणि घरातील सोन्याचे दागिणे 4 लाख 80 हजार रुपये किंमतीचे आणि 500 रुपये रोख रक्कम असा 4 लाख 80 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. धर्माबाद पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 344/2024 प्रमाणे दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक रोकडे अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 697 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रेल्वे नोकरीचे खोटे नियुक्ती पत्र देवून 13 लाखांची फसवणूक राज्यात दोन अपर पोलीस महासंचालक आणि तीन पोलीस अधिक्षकांना नवीन नियुक्त्या