नांदेड(प्रतिनिधी)-निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर बदली करण्यात आलेले 215 पोलीस निरिक्षक पुन्हा त्यांच्या पसंतीच्या जागी पाठविण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) डॉ.सुखविंदरसिंह यांनी जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये नांदेड येथील दोन पोलीस निरिक्षक मुंबईला गेले आहेत.
विधानसभा निवडणुकीपुर्वी निवडणुक आयोगाने नाराजी व्यक्त केल्यानंतर जवळपास 100 पेक्षा जास्त पोलीस निरिक्षकांना मुंबई सोडून पोलीस प्रशिक्षण केंद्र , मराठवाडा, विदर्भ, ्रगडचिरोली आदी भागात नियुक्ती देण्यात आली होती. बहुतांश पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सर्व पोलीस निरिक्षकांना मुंबईमध्ये बोलावण्यात आले होते.
आता निवडणुक संपली त्यानंतर या पोलीस निरिक्षकांनी आपल्या अडचणी सांगत आपल्या पसंतीच्या नियुक्त्या मागितल्या. त्यात पोलीस प्रशिक्षण केंद्रातून आलेले सर्व पोलीस निरिक्षक, राज्य गुन्हे अन्वेशन विभागातून आलेले सर्व पोलीस निरिक्षक, नागरी हक्क संरक्षण विभागातून आलेले सर्व पोलीस निरिक्षक परत पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये 155 पोलीस निरिक्षक मुंबई येथे अणि त्या शिवाय 3 वेगळ्या याद्यांमध्ये अनुक्रमे 30, 26, 4 असे एकूण 215 पोलीस निरिक्षकांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदली देण्यात आली आहे. या यादीतील पोलीस निरिक्षक मंजुषा नंदकुमार परब आणि सागर जगन्नाथ शिवलकर हे दोघे नांदेड येथून मुंबई शहरात पाठविण्यात आले आहेत.
या बातमीसोबत पोलीस महासंचालक कार्यालयाने जारी केलेली पीडीएफ संचिका वाचकांच्या सोयीसाठी जोडली आहे.