नांदेड(प्रतिनिधी)-बजरंगनगर नरसी येथे एका जावयाने आपल्या सासुचा खून या कारणासाठी केला आहे की, ती सासु त्याच्या पत्नीला नांदवायला पाठवत नाही. रामतिर्थ पोलीसांनी मारेकरी जावयाला पकडल्यानंतर नायगाव न्यायालयाने त्यास दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
पार्वती महेश रॅपनवाड या युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार दि.11 डिसेंबर रोजी दुपारी 4.30 वाजेच्यासुमारास बजरंगनगर नरसी ता.नायगाव येथे अशोक किशन धोतरे(42) रा.उल्हासनगर तरोडा खुर्द नांदेड याने त्याची सासु पारुबाई लक्ष्मण रॅपनवाड (62) हिच्या डाव्या बाजूच्या मानेवर चाकुने वार करून तिचा खून केला आहे. अशोक किशन धोत्रेचा पारुबाई रॅपनवाडवर आरोप आहे की, ती त्याच्या पत्नीला नांनदण्यासाठी पाठवत नाही. रामतिर्थ पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमंाक 321/2024 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास रामतिर्थचे सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीधर जगताप हे करत आहेत. श्रीधर जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सासुचा मारेकरी जावई अशोक किशन धोत्रे यास पकडल्यानंतर न्यायालयासमक्ष हजर केले. न्यायालयाने त्यास दोन दिवस अर्थात 14 डिसेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.