वाहतुक विभागाने जवळपास 3 लाख रुपये दंड वसुल केला

नांदेड(प्रतिनिधीस)-नांदेड शहरातील रस्त्यांवर वेगवेगळ्या छोट्या-छोट्या व्यवसायीकांमुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीला तोडण्यासाठी वाहतुक शाखा क्रमंाक 1 वजिराबाद यांनी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली. तसेच 182 वाहन चालकांवर कार्यवाही करून 2 लाख 43 हजार 750 रुपये दंड वसुल केला. तसेच 79 वाहन चालकांकडून त्यांच्या वाहनांवर पुर्वी आकारण्यात आलेला जुना थकबाकी दंड 48 हजार 250 रुपये वसुल केला.

पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार 10 व 11 डिसेंबर रोजी शहर वाहतुक शाखा क्रमांक 1 वजिराबाद आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शहरातील फुथपाथवर, डॉक्टर्स लेनमधील फुथपाथवर बसलेले किरकोळ कपडे विक्रेते, कटलेरी विक्रेते, वजिराबाद ते एस.टी.उड्डाणपुलपर्यंत बसलेले फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, हात गाडे काढून बेशिस्तपणे वाहनतळ केलेल्या वाहनांवर दंडात्मक कार्यवाही केली. या मोहिमेत वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक साहेबराव गुट्टे, सहाय्यक पोलीस निरिक्षक बळवंत जमादार, पोलीस उपनिरिक्षक भंडारे, वाहतुक पोलीस अंमलदार, दंगा नियंत्रण पथक आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कार्यवाही केली. या कार्यवाही दरम्यान वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 182 वाहन चालकांकडून 2 लााख 43 हजार 750 रुपये दंड वसुल करण्यात आला. तसेच जुना थकबाकी असलेला दंड 79 वाहन चालकांकडून 48 हजार 250 रुपये वसुल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!