नांदेड – नायगाव (खै.) तालुक्यातील मौ. मेळगाव, सांवगी, धनज परिसरातील सन 2019-2020 मधील 4304.98 ब्रास तसेच सन 2019 मधील मौ. ईज्जतगाव (बु.) येथील 700.00 ब्रास असे एकुण 5004.98 ब्रास अवैध उत्खननातून जप्त करण्यात आले होते. या रेतीसाठ्याचा लिलाव 600 रुपये या दराने उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय नायगांव (खै.) येथे बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वा. ठेवण्यात आला आहे. लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी यात भाग घ्यावे. लिलावाच्या अटी व शर्ती तहसिल कार्यालय नायगांव (खै.) च्या नोटिस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आले आहे, असे तहसिलदार नायगांव (खै.) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
More Related Articles
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार 31 ऑगस्टपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन नांदेड: -राज्य शासनाच्या…
पोलीस अंमलदार जगन्नाथ पवार यांचे निधन
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस अंमलदार जगन्नाथ पवार यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानंतर निधन झाले आहे.…
जनसेवा प्रतिष्ठानची मागणी:फास्ट ट्रॅक कोर्टला प्राधान्य
तात्काळ अत्याचाराचे एक प्रकरण निपटवणे आवश्यक नांदेड- दिवसेंदिवस बलात्कार, अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. सर्व…