नांदेड(प्रतिनिधी)-10 डिसेंबर रोजी नांदेड ग्रामीण पोलीसांनी आणि स्थानिक गुन्हा शाखा पोलीसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी 15 गोवंश जातीचे बैल पकडले आहेत. त्यांची एकूण किंमत 5 लाख 93 हजार रुपये आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, रविशंकर बामणे आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार शेख फारुख शेख मदारसाब या तिघांनी दिलेल्या स्वतंत्र तक्रारीनुसार इकबालनगर, आलू कांदा मार्केट आणि मिलत्तनगर गल्ली क्रमांक 6 येथे स्थानिक गुन्हे शाखा आणि नांदेड ग्रामीण पोलीसांनी एकूण 15 गोवंश जातीचे बैल पकडले.त्यांची किंमत 5 लाख 93 हजार रुपये आहे. या संदर्भाने मोहम्मद जाफर मोहम्मद शरीफ (58) रा.इकबालनगर देगलूरनाका नांदेड, शेख कलीम शेख मुसा (42) रा.खुदबेनगर देगलूरनाका, मोहम्मद कासीम मोहम्मद छोटू मियॉ (35) रा.देगलूरनाका नांदेड, मोहम्मद फेरोज अब्दुल करीम (35) रा.टायरबोर्ड देगलूरनाका नांदेड, मोहम्मद फारुख कुरेशी मोहम्मद रशीद कुरेशी(57) रा.मदीनानगर नांदेड या पाच जणांविरुध्द अनुक्रमे गुन्हा क्रमंाक 1142, 1143, 1144/2024 दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार शेख फारूख, यालावार, अर्जुन मुंडे, श्रीराम दासरे, रविशंकर बामणे, लोसरवाड, विठ्ठल शेळके, बालाजी यादगिरवाड यांचे कौतुक केले आहे.
5 लाख 93 हजारांचे 15 गोवंश जातीचे बैल पकडले
