शहरातील विनायक नगर भागात कंपाउंड मधले चंदनाचे झाड चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील विनायकनगर भागात एका घराच्या कंपाऊटमध्ये असलेले 18 हजार रुपये किंमतीचे चंदनाचे झाड चोरट्यांनी चोरून नेले आहे.

राजू रावण ढगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 डिसेंबरच्या रात्री 10 ते 8 डिसेंबरच्या पहाटे 6 वाजेदरम्यान त्यांच्या बंगल्याच्या कंपाऊंटमध्ये असलेले चंदनाचे झाड 18 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी चोरून नेले आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 498/2024 प्रमाणे दाखल केला आहे. पोलीस अंमलदार मंगनाळे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!